आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बूचा ग्लॅमरस लूक:ब्लॅक ड्रेसमध्ये अतिशय स्टनिंग दिसली अभिनेत्री, व्हिडिओ बघून फॅन्स झाले इम्प्रेस

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे, त्याचा व्हिडिओ स्वतः तब्बूने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ब्लॅक ड्रेसमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत असून चाहत्यांना तिचा हा लूक पसंत पडला आहे. या फोटोशूटमध्ये तब्बूने ब्लॅक ड्रेसवर केस मोकळे सोडले आहेत.

तब्बूने शेअर केला व्हिडिओ
तब्बूने व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ते अनेकांना टॅग केले आहे, सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'रोज एक पोज'. चाबत्यांना तब्बूचा हा लूक आवडला असून त्यांनी फोटो व व्हिडिओवर लाइक कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. लव् यू गॉर्जिअस लेजी, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

तब्बू नुकतीच 'भूल भुलैया 2'मध्ये दिसली होती.
तब्बू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अलीकडेच 'भूल भुलैया 2' मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. तिच्याशिवाय कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकची कमाई केली होती.

तब्बूने नुकतेच अजय देवगणसोबत 'भोला' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले
तब्बू अनेक चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये दिसली आहे. तिने नुकतेच अजय देवगणसोबत 'भोला' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अजय देवगण सोबतचा हा तिचा नववा चित्रपट आहे. तब्बू आणि अजयची जोडी बॉक्स ऑफिसची लोकप्रिय जोडी असून त्यांच्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे.

बातम्या आणखी आहेत...