आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काैटुंबिक नाट्यासह मर्डर मिस्ट्रीवर आधारित चित्रपट:तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ला असेल हरिद्वारची पार्श्वभूमी, वर्षभरापासून रखडला होता चित्रपट

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 मार्चला रिलीजची तयारी, अजून झाली नाही अधिकृत घोषणा

तापसी पन्नू सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तिच्या खात्यात सध्या ‘दोबारा’, ‘लूप लपेटा’, ‘शाबास मितु’, ‘रश्मि रॉकेट’ सारखे चित्रपट आहेत. एकीकडे तिच्या ‘लूप लपेटा’चे शूटिंग पूर्ण झाले आहे तर दुसरीकडे ‘दोबारा’ आणि ‘शाबास मितु’वर काम सुरू आहे. याशिवाय ‘हसीन दिलरुबा’चेदेखील पूर्ण शूटिंग झाले आहे. या चित्रपटाविषयी खास माहिती दिव्य मराठीच्या हाती लागली आहे.

सूत्रानुसार, चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला होता, त्यात तापसीच्या पायाखाली रक्त पसरलेले दिसत होते. त्यावरुन हा चित्रपट हत्येवर आधारित असल्याचा अंदाज लावला जात होता. चित्रपटात हाणामारीचे दृश्य नाहीत. तापसी यात हाऊसवाइफच्या भूमिकेत आहे. विक्रांत मैसी तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर हर्षवर्धन राणे दोघांच्या शेजारच्या भूमिकेत आहे. त्यांच्यात काही लव्ह ट्रँगलदेखील नाही. मात्र खून कुणाचा आणि का होतो ? कोण करते ? त्यावरच पूर्ण चित्रपट आधारित आहे.

हरिद्वारमध्ये 40-50 दिवसांच्या शेड्यूलमध्ये पूर्ण झाले शूटिंग
विशेष म्हणजे चित्रपटाचे शूटिंग हरिद्वारच्या प्रसिद्ध लोकेशनवर झाले. चित्रपटातील पात्राचे घर तेथे असते. पूर्ण टीम येथे 40 ते 50 दिवस थांबले होते. कोरोना महामारी पसरण्याच्या आधीच गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते. ‘हसीन दिलरुबा’चे शूटिंग मोदी भवनमध्ये झाले आहे. त्यामुळे तेथे शूट होणारा तो पहिला चित्रपट ठरला आहे. शिवाय तो टिपीकल फॅमिली ड्रामा होणार नाही, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. यात एकही गाणे नाही. मात्र बॅकग्राऊंडमध्ये एक गाणे चालवले जाईल.

बैरागी कॅम्पमध्ये चित्रित केले तापसी-विक्रांतचे कारने पाठलाग करण्याचे दृश्य
खरं तर, या चित्रपटाची थीम कौटुंबिक नाट्यावर आधारित आहे मात्र यात एक मर्डर मिस्ट्रीदेखील दाखवली जाईल. त्यामुळे त्यात थोडी अॅक्शन देखील असणार आहे. यात तापसी आणि विक्रांत मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा सांगणार आहेत. दोघांचे एखादे अॅक्शन दृश्यदेखील असणार आहे. हरिद्वारच्या बैरागी कँपमध्ये तापसी आणि विक्रांतच्या कारचे पाठलाग करतानाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. दोघे एका बाइकचा पाठलाग करतात. हे दृश्य हरिद्वारच्या रस्त्यावरुन थेट बैरागी कॅम्पमध्ये पोहोचते. विशेष म्हणजे हे दृश्य वर्दळ असणाऱ्या जागी शूट करण्यात आले. त्यावेळी तेथे कुंभचे कॅम्प लावण्यात आले होते.

हरिद्वारमध्ये सध्या बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अमिताभ बच्चनदेखील मे-जूनमध्ये तेथे शूटिंगसाठी जाणार आहेत. अमिताभ तेथे ‘मे-डे’चे शूट करणार आहेत. चित्रपटात कुंभमेळ्याचादेखील उल्लेख आहे.

‘जहाजी’ आणि ‘वो लड़की है कहां’मध्ये दिसणार तापसी
शाहरुख खान, राजकुमार हिराणी यांचा ‘जहाजी’देखील तापसीच्या खात्यात आहे. शाहरुखसोबत तिचा हा पहिला चित्रपट आहे. यात ती त्याच्यासोबत रोमान्स करतानाही दिसणार आहे. यापूर्वी तापसीने रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत ‘बदला’मध्ये काम केले आहे. दुसरीकडे ‘वो लड़की है कहां’मध्येही तापसी मुख्य भूमिकेत आहे. यात तिच्यासेाबत प्रतीक गांधी दिसणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे, तो मध्यभारतावर आधारित आहे. यात तापसी एका चंचल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. अरशद सैयद दिग्दर्शन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...