आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

69 वर्षांच्या झाल्या झीनत:घटस्फोटापूर्वीच झाले होते झीनतच्या नव-याचे निधन, संजय खानने एवढी मारहाण केली होती की उजव्या डोळ्याला लागला होता जबर मार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झीनत यांना शस्त्रक्रिया करावी लागली होती.

गतकाळातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक झीनत अमान 19 नोव्हेंबर रोजी आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहे. झीनत अमान यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळे नाही. झीनत यांचे एकेकाळी चार्मिंग अॅक्टर संजय खान यांच्यासोबत नाव जुळले होते. संजय खान यांनी 1980 मध्ये एका पार्टीत झीनत अमान यांना जबर मारहाण केली होती. याचा उल्लेख त्यांनी आपल्या द बिग मिस्टेक्स ऑफ माय लाइफ या आत्मचरित्रातदेखील केला आहे.

पहिल्या पतीचे झाले होते निधन
झीनत यांनी 11 ऑक्टोबर 1985 रोजी अभिनेता मजहर खानशी लग्न केले होते, परंतु काही दिवसानंतरच दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. बातम्यांनुसार, मजहर झीनत यांना कायम मारहाण करायचे. त्यांना जहान आणि अजान ही दोन मुले झाली. मात्र तरीही त्यांच्यातील वाद थांबत नव्हता.

मजहर यांना काही वर्षांनंतर मूत्रपिंडाचा संसर्ग झाला ज्यामुळे ते आजारी राहू लागले आणि शेवटी 1998 मध्ये किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. रिपोर्टनुसार, मजहर यांच्या त्रासाला कंटाळून झीनत यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु घटस्फोट घेण्यापूर्वीच मजहर हे जग सोडून गेले.

संजय खान करायचे मारहाण
झीनत अमान आणि संजय खान यांचे प्रेम बरेच चर्चेत राहिले. दोघांनी 'अब्दुल्ला’च्या शूटिंगदरम्यान गुपचूप लग्न केले असल्याचीही चर्चा होती. त्या वेळी संजय विवाहित होते आणि तीन मुलांचे वडील होते. एकदा संजय खान यांनी झीनतला एका गाण्याच्या शूटिंगसाठी बोलवले होते, मात्र व्यग्रतेमुळे झीनत येऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे संजय नाराज झाले होते आणि त्यांना फोनवर खूप काही बोलले.

झीनत संजय खान यांचे बोलणे ऐकून खूप घाबरल्या आणि 3 नोव्हेंबर 1979 मध्ये मुंबईतील हॉटेल ताजमध्ये एका पार्टीत त्यांना भेटायला गेल्या. तेव्हा संजय यांनी सर्वांसमोर त्यांना रागाच्या भरात खूप मारहाण केली. या हाणामारीत झीनत यांच्या जबड्याला आणि उजव्या डोळ्याला मार लागला, त्यामुळे झीनत यांना शस्त्रक्रिया करावी लागली होती. जेव्हा या दोघांच्या नात्याविषयी संजय खान यांच्या पत्नी जरीन यांना समजले, तेव्हा मोठे वादंग उठले होते. अखेर झीनत आणि संजय यांचे नाते संपुष्टात आले.

बातम्या आणखी आहेत...