आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिस्चार्ज:कोरोनाव्हायरसवर 'या' अभिनेत्रीची यशस्वी मात, उपचारानंतर रुग्णालयातून घरी परतली; सेल्फी शेअर करुन कोरोना वॉरियर्सचे मानले आभार 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झोया मोरानीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी शेअर करुन ही चांगली बातमी शेअर केली आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानीने कोरोनाव्हायरस या आजारावर यशस्वी मात केली असून तिला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 एप्रिल रोजी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला 7 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी शेअर करुन ही चांगली बातमी शेअर केली आहे. या सेल्फीमध्ये झोयाने सर्जिकल मास्क घातलेला दिसतोय. तिच्या मागे रुग्णालयातील कर्मचारीही दिसत आहेत. झोयाने लिहिले की, 'वॉरियर्सची निरोप घेण्याची वेळ आली आहे, मी नेहमीच त्यांना प्रार्थनांमध्ये लक्षात ठेवेल. गुड बाय आयसोलेशन आयसीयू, आता वेळ आहे होम स्वीट होमची!'

वरुण धवनसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह : डिस्चार्ज होण्यापूर्वी झोयाने वरुण धवनसोबत हॉस्पिटलमधूनच इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन केले होते. या सेशनमध्ये तिने सांगितले की, तिची तब्येत वेगाने सुधारत आहे आणि तिला बरे वाटू लागले आहे. उपचारानंतर दुसर्‍या दिवसापासून झोयामध्ये सुधारणा दिसली. तिने सांगितले की, मला श्वास घ्यायला त्रास होत होता, पण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी हा त्रास नाहीसा झाला होता. थोडे कंजेशन आणि ताप होता. मला इस्पितळात घरापेक्षा बरे वाटले.

वडील अद्याप रुग्णालयात : झोयापूर्वी तिची धाकटी बहीण शाजालाही कोरोनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले होते, परंतु कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिचे वडील करीम मोरानी अद्याप उपचार घेत आहेत. मोरानी कुटुंबात सर्वप्रथम शाजाला कोरोनाची लागण झाली होती. ती मार्च महिन्यात श्रीलंकेहून परतली होती. त्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. शाजानंतर झोया आणि करीम मोरानी यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या.  

बातम्या आणखी आहेत...