आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रोखठोक मत:कास्टिंग काऊच आणि ड्रग्जविषयी अदा शर्माने व्यक्त केले मत, म्हणाली, कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात आहे, फक्त नाव वेगळे आहे

उमेशकुमार उपाध्याय, मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अदा शर्मा म्हणते, बॉलिवूडमध्ये आतापर्यंतचा माझा सर्वात चांगला अनुभव राहिला आहे.

अभिनेत्री अदा शर्माने 2008 मध्ये हॉरर चित्रपट ‘1920’ मधून पदार्पण केले होते. नंतर तिने ‘हंसी तो फंसी’मध्येही काम केले. मात्र तिला 'कमांडो'मधून लोकप्रियता मिळाली. कारण तिने या चित्रपटात अभिनयाबरोबरच जबरदस्त अॅक्शनदेखील केली होती. अदा शर्मा नुकतेच हैदराबाद आणि निलगिरी फॉरेस्टमध्ये तेलुगू चित्रपटाची शूटिंग पूर्ण करुन आली आहे. नुकताच तिचा चित्रपट ‘सोलसाथी’ अाला आहे. यात तिने दुहेरी भूमिका केली आहे. अदाने कास्टिंंग काऊच आणि ड्रग्जच्या मुद्द्यावर चर्चा केली...

  • सोलसाथी निवडण्याचे कारण ?

अदा म्हणते, यात मी पहिल्यांदाच स्टार बनले आहे. पहिल्यांदाच रोमकॉमचे पात्र मिळाले आहे. आतापर्यंत हॉरर, अॅक्शन, नाट्य धाटणीचे चित्रपटकरत आले आहे. निवडक गोष्टी करायला आवडतात, ज्या गोष्टी मनाला चांगल्या आवडतात, तेच करते. त्यामुळेच ‘सोलसाथी’चे बंगाली दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यांना चांगले ओळखत नसूनही त्यांच्यासोबत काम करायला तयार झाले. फक्त कथा ऐकून तासाभरात त्यांना होकार कळवला होता. आतापर्यंतचा माझा सर्वात चांगला अनुभव राहिला आहे.

  • बॉलिवूडमध्ये सध्या कास्टिंग काउच, मीटू सर्व काही सुरू आहे, याविषयी काय सांगशील ?

बॉलिवूडमध्येच कास्टिंग काऊच आहे असे नाही, प्रत्येक क्षेत्रात कास्टिंग काऊच होते. मात्र तेथे हा शब्द वापरत नाहीत तर मात्र सर्व गोष्टी सारख्याच असतात. कोणी आपल्या क्षमतेचा वापर करताे तर कोणी बाजू घेत पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र लोकांना बॉलिवूडच्या गोष्टी मिर्ची मसाल्याप्रमाणे वाचायला आवडते. कास्टिंग काऊचचा माझा अनुभव सांगायचे झाले तर, माझ्यासोबत तर असे काही झाले नाही, माझ्या घरी फर्निचर नाही, आम्ही लोक जमिनीवर बसतो तर मी कास्टिंग काऊचवर बसलेली नाही. मला चांगले अनुभव आहे. कुणी ऑफर केली तरी मी धुडकावून लावली. मला सुरुवातीपासूनच चांगले लोक मिळाले. मला पहिला चित्रपट ‘1920’ ऑडिशनने मिळाला होता. त्यावेळी माझ्याकडे चांगले फोटाेदेखील नव्हते. त्यातही मी चांगली दिसत नव्हते. ऑडिशन देऊनच ‘जगन्नाथपुरी’ मिळाला. जेथे चांगले लोक असतात, तेथे वाईट असतातच.

  • इंडस्ट्रीत 90 टक्के लोक ड्रग्ज घेत असल्याचे लोक म्हणतात, तू काय सांगशील ?

मला माहित नाही, लोक किती टक्के ड्रग्ज घेतात. स्वतःबद्दल सांगायचे झाले तर मी ड्रग्ज घेत नाही किंवा मी कधीही ड्रग्ज घेतले नाही. खरं तर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, तेव्हा यावर पुराव्याशिवाय टिप्पणी करणे चुकीचे आहे. यावर फौजदारी खटला होऊ शकताे. कायद्यात असे लिहिलेले आहे. मी सेलिब्रिटीही आहे, मी लाेकांमध्ये जास्त मिसळत नाही. मला भावंड नाहीत, म्हणून लहानपणापासूनच मला स्वत:सोबत वेळ घालवण्याची सवय आहे. लोक म्हणतात, तुम्ही नकारात्मक आहात, मात्र मी स्वतःच्या निर्णयामुळे आनंदी आहे.