कोरोना लॉकडाऊन : अदा शर्माने शेअर केला फनी व्हिडिओ, एक्सरसाइजसोबत साफसफाईची ट्रिक सांगितली 

  • अदा शर्माने मजेशीर अंदाजात घर साफ करण्याची पद्धत सांगितली आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 05:41:00 PM IST

बॉलिवूड डेस्क. कोरोनाव्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बॉलिवूड सेलेब्स लॉकडाऊनमुळे मिळालेला मोकळा वेळ त्यांच्या पद्धतीने वापरत आहेत. अभिनेत्री अदा शर्मासुद्धा रिकामा वेळ प्रॉडक्टिव्ह करण्यासाठी कसलीही कसर सोडत नाहीये. ती चाहत्यांना तिच्या डेली रुटीनबद्दलची माहिती देऊन इंस्टाग्रामवर सतत आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करतेय. अलीकडेच अदाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने मजेशीर अंदाजात घर साफ करण्याची पद्धत सांगितली आहे.

  • साफसफाईसोबत व्यायाम

अदाने जो नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती व्यायामाबरोबर साफसफाई आणि लादी पुसताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले - तुमच्या अशा सर्व मित्रांना टॅग करा, ज्यांना तुम्ही हे काम करताना बघू इच्छिता. क्रिएटिव्ह कटका अदाची अदा स्टाईल! तुमच्यापैकी बरेचजण असे म्हणत असतील की साफसफाईच्या कामात व्यायामाला वेळच मिळात नाही तर तुमच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. जर फोन वाजला तर लक्ष भटकू देऊ नका कोरोनाच्या काळात घराबाहेर पडू नका सुरक्षित आणि स्वच्छ रहा. 2008 मध्ये 1920 या चित्रपटाद्वारे अदाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर हसीं तो फंसी, कमांडो 2, कमांडो 3, बायपास रोड अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

View this post on Instagram

Tag all your friends who should do this today ! . Creative katka adah_ki_adah style ! . Many of you will say no time to exercise now because we have to clean our houses ..I have a solution for that 😁 katka-mein-bhi-adah 💃😉 . If the phone rings don't succumb to the weapon of mass distraction 😁😁 bulate hai aur jaa bhi sakte hai...lekin corona ke baad till then stay home , stay safe, stay clean ♥️ #bulatehaimagarjaosirfcoronakebaad . #creativekatkaadahstyle #katkaadah #corona #katkameinbhiadah #adahsharma #workout #workoutmotivation #workoutathome . P.s.these hands don't just play the piano 😉🐙 Shot by @adah_ki_radha

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on Mar 24, 2020 at 5:05am PDT

X