आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन विश:अदा शर्माने आजीसोबतचे दोन मजेशीर व्हिडिओ केले शेअर, त्यांच्यासोबत डान्स आणि कॅटवॉक करताना दिसली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या व्हिडिओमध्ये आजीसह डान्स केला. दुसर्‍या व्हिडिओमध्ये केला रॅम्प वॉक...

अभिनेत्री अदा शर्माने गुरुवारी रात्री उशिरा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आजी (आईची आई) सोबत मस्ती करताना दिसली.  हे व्हिडिओ शेअर करुन लॉकडाऊन संपल्यानंतर तिला सर्वप्रथम आजीला भेटायला आवडेल, असेही तिने सांगितले. 

अदाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'अशा लोकांना टॅग करा, ज्यांना भेटण्यासाठी तुम्ही लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा करत आहेत. माझ्या या यादीत पहिले नाव माझ्या आजीचे आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये ती मला 'फॅशन वॉक' शिकवत आहे. #फॅशनवॉक #अदाशर्माची 100 वर्षे'

  • पहिल्या व्हिडिओमध्ये आजीसह डान्स केला.

अदाने जे दोन व्हिडिओ शेअर केले  आहेत, त्यापैकी पहिल्या व्हिडिओत ती 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातील 'बम डिगी-डिगी बम-बम' या गाण्यावर आजीसोबत थिरकताना दिसली. या डान्समध्ये आजीनेही तिला पूर्ण साथ दिली.  

  • दुसर्‍या व्हिडिओमध्ये रॅम्प वॉक

या पोस्टमध्ये अदाने जो दुसरा व्हिडिओ शेअर केला, त्यात ती आई आणि आजीसोबत फॅशन शो दरम्यान केला जाणारा रॅम्पवॉक करताना दिसली. याचा उल्लेख तिने कॅप्शनमध्ये करताना लिहिले, 'आजी मला' फॅशन वॉक 'करायला शिकवत आहे. हे दोन्ही व्हिडिओ घरी बनवले आहेत.' 

  • म्हणून प्रत्येक पोस्टमध्ये '#अदाशर्माके 100 साल' हा हॅशटॅग वापरते

अदा आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये  '#अदाशर्माके 100 साल' हा हॅशटॅग ठेवते. 2020 च्या सुरुवातीस तिने याबद्दल सांगितले होते. अदाच्या म्हणण्यानुसार, '1920' च्या हॉरर चित्रपटातून तिने पदार्पण केले.  आणि 1920 ते 2020 मधील अंतर 100 वर्षे आहे, म्हणून तिचा असा विश्वास आहे की तिच्या पदार्पणाला 100 वर्षे झाली आहेत. म्हणून ती 'अदा शर्मा के 100 साल' असे लिहिते.

बातम्या आणखी आहेत...