आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:अ‍ॅड. विकास सिंह यांचा दावा - सुशांतचा गळा दाबून खून; अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले - विकास सिंह यांचा माध्यमांकरवी तपाससंस्थेवर दबाव टाकणे अयोग्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एम्सच्या डॉक्टरने ही 200% हत्या असल्याचे सीबीआयसमोर सांगणे, अशी खासगी चर्चा म्हणजे कायद्यानुसार पुरावा ठरू शकत नाही.

सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांकरवी तपाससंस्थेवर दबाव टाकणे याेग्य नसल्याचे मत विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. अ‍ॅड. निकम म्हणाले, सीबीआय स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. ती तिचे काम करत आहे. एम्सचे डॉक्टर व सीबीआयच्या बैठकीतून निष्कर्ष काय निघाला? ते जाहीर झालेले नाही. त्यामुळे अशा टिप्पण्या योग्य नाहीत. एम्सच्या डॉक्टरने ही 200% हत्या असल्याचे सीबीआयसमोर सांगणे, अशी खासगी चर्चा म्हणजे कायद्यानुसार पुरावा ठरू शकत नाही. या प्रकरणाचा आधार घेत भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले तर आश्चर्य वाटायला नको, असे अ‍ॅड. सिंह यांनी म्हटले याचा अर्थ काय? असे ते म्हणाले.

  • काय म्हणाले होते सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी दावा केला की, गळा दाबूनच सुशांतची हत्या करण्यात आली. हा प्रकार आत्महत्या म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. सीबीअायच्या तपास अहवालातील विलंब निराशाजनक आहे. तपास कार्यातील एम्सच्या एका डॉक्टरने आपल्याला सांगितले होते की सुशांतचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे, गळफास घेतल्याने नाही.