आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभासचा लूक बदलला:दिग्दर्शक ओम राऊत काळजीत, प्रभासचे वजन का वाढले यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी यूकेत होणार स्पेशल बॉडी टेस्ट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटातील एका गाण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रभास मुंबईत आला होता.

काही दिवसांपूर्वी प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात त्याचा लूक खूप बदललेला दिसला होता. त्याचा फोटो पाहून हा नक्की प्रभासच आहे? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला. यात प्रभासचे वजन खूप वाढलेले दिसले. त्यामुळे त्याचे वाढलेले वयदेखील चेह-यावर स्पष्ट दिसले. साहजिकच यावरुन त्याच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीम काळजीत पडली आहे.

या चित्रपटातील एका गाण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी प्रभास मुंबईत आला होता. त्याच्यासोबत क्रितीदेखील या सरावात सहभागी झाली होती. 'आदिपुरुष 'या चित्रपटात प्रभाससह क्रिती सेनॉन आणि बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यूकेमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार केले जातील
रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत प्रभासच्या अचानक वाढलेल्या वजनामुळे काळजीत पडले आहेत. त्यांनी चित्रपटाचे निर्माते आणि क्रू मेंबर्सच्या मदतीने प्रभासला त्याच्या वाढलेल्या वजनामागील कारणांचा शोध घेण्यासाठी यूकेत जाण्यासाठी तयार केले आहे. तिथे प्रभासच्या स्पेशल बॉडी टेस्ट केल्या जातील.

ओम राऊत यांच्या म्हणण्यानुसार, प्रभासवर जगप्रसिद्ध डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ उपचार करतील, त्यानंतर त्याचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

अशा प्रकारे ट्रोल झाला होता प्रभास
प्रभासचा हा फोटो सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर नेटक-यांनी त्याला ट्रोल केले होते. प्रभासचा फोटो पाहून एका चाहत्याने ‘हा स्क्रीनवर फार वेगळा दिसतो’ असे म्हटले होते. तर दुसऱ्या एका यूजरला ‘हा नक्की प्रभासच आहे?’ असा प्रश्न पडला आहे. तिसऱ्या एका यूजरने ‘बापरे मी ओळखलेच नाही हा प्रभास आहे’ असे म्हटले आहे. तर एक जण म्हणाला होता, 'प्रभास 65 वर्षांचा दिसतोय.' आणखी एक यूजर म्हणाला होता की, 'कुणी तरी बाहुबलीला दोन तास पाण्यात भिजवले.'

मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी जवळपास 350 ते 400 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ,तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...