आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत सध्या त्याच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज दुपारी त्याच्या या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. मात्र ओम राऊतसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. प्रदर्शनाच्या काही तास आधीच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लीक झाला असून त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
खरं तर प्रभास आणि क्रिती सेनन ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी हैदराबादला पोहोचले होते. एएमबी सिनेमा येथे चाहत्यांसाठी त्यांनी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. याच दरम्यान काहींनी हा ट्रेलर त्यांच्या मोबाइलवर शूट केला. मुंबईत ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच लोकांनी तो सोशल मीडियावर लीक केला आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
या व्हायरल होत असलेल्या अडीच मिनिटांच्या क्लिपमध्ये श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात गेलेले दिसत आहेत. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. त्यानंतर हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता देवदत्त नागेची एंट्री या ट्रेलरमध्ये होते आणि तो लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना या ट्रेलरमध्ये दाखवला गेला आहे. हनुमान जी अंगठी घेऊन सीता मातेकडे जातो, त्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.
अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानची एक छोटीशीच झलक यात दिसते. वादानंतर या चित्रपटातील रावणाचा लूकही बदलण्यात आला असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
16 जून रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट
या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनने माता सीतेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2 डी, 3 डी, आयमॅक्स सारख्या फॉर्मेटमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट जगभरातील सुमारे 20 हजार पडद्यावर 16 जून रोजी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.