आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटाचा ट्रेलर 9 मे रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्रभासने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
18 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर
भारताव्यतिरिक्त चित्रपटाचा ट्रेलर अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, फिलीपिन्स, म्यानमार, श्रीलंका, जपान, आफ्रिका, यूके, रशिया, इजिप्त या देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
न्यूयॉर्कच्या ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर
न्यूयॉर्कच्या ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये 13 जून रोजी मध्यरात्री या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मीडनाइट ऑफरिंग म्हणून सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर 3D मध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असून ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत तर क्रिती सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
VFX वर काम करण्यासाठी पुढे ढकलण्यात आली प्रदर्शनाची तारीख
यापूर्वी, चित्रपट निर्मात्यांनी 2022 मध्ये चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला होता. मात्र हा टिझर प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. अतिशय निकृष्ट दर्जाच्या व्हीएफएक्सचा वापर करण्यात आल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले होते.
यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्सवर काम करण्यासाठी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. याआधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता पण आता हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार आहे. क्रिती सेनन, प्रभास, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, काजोल, सनी सिंग, कीर्ती सुरेश, सोनल चौहान, वत्सल सेठ आणि तृप्ती तोरडमल हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.