आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा संपली:बहुचर्चित 'आदिपुरुष'चा ट्रेलर आला भेटीला, वादानंतर नवीन बदलांसह निर्मात्यांनी 70 देशांत रिलीज केला ट्रेलर

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये श्रीरामांच्या भूमिकेत प्रभास, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी, सीतामातेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागेची झलक पाहायला मिळतेय. मुंबईतील PVR जुहू येथे चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच इव्हेंट ठेवण्यात आला. येथे चाहत्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर डिजिटली रिलीज करण्यात आला.

काही महिन्यांपूर्वी चित्रपटाचा टिझर रिलीज झाला होता. त्यावेळी त्यातील व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरुन बरीच टीका झाली होती. आता ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी सीन्समध्ये बरेच बदल केल्याचे दिसून येत आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर #आदिपुरुष ट्रेंड करत आहे.

ट्रेलरमध्ये श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात गेलेले दिसत आहेत. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या अभिनेता देवदत्त नागेची एंट्री या ट्रेलरमध्ये होते आणि तो लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना या ट्रेलरमध्ये दाखवला गेला आहे. यानंतर राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून श्रीलंकेला जाताना दिसत आहेत. एवढेच नाही तर हनुमान जी अंगठी घेऊन सीता मातेकडे जातो, त्याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानची एक छोटीशीच झलक यात पाहायला मिळतेय.

16 जून रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट

या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनने माता सीतेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 2 डी, 3 डी, आयमॅक्स सारख्या फॉर्मेटमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट जगभरातील सुमारे 20 हजार पडद्यावर 16 जून रोजी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

रिलीजपूर्वीच लीक झाला होता आदिपुरुषचा ट्रेलर

ट्रेलर रिलीजच्या काही तास आधीच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लीक झाला असून त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

खरं तर प्रभास आणि क्रिती सेनन ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी हैदराबादला पोहोचले होते. एएमबी सिनेमा येथे चाहत्यांसाठी त्यांनी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. याच दरम्यान काहींनी हा ट्रेलर त्यांच्या मोबाइलवर शूट केला. मुंबईत ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच लोकांनी तो सोशल मीडियावर लीक केला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी...