आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओम राऊत दिग्दर्शित आणि प्रभास-क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. मुंबईतील PVR जुहू येथे आयोजित एका ग्रँड इव्हेंटमध्ये हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच त्याने 'RRR' चा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
हिंदीतील 51 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला ट्रेलर
'आदिपुरुष'च्या हिंदी ट्रेलरने 21 तासांत यूट्यूबवर 51 मिलियनहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडले आहेत. यू व्ही मोशनने शेअर केलेल्या ट्रेलरला तेलुगुमध्ये 10 मिलियन, तमिळ आणि मल्याळममध्ये 3.3 मिलियन आणि कन्नडमध्ये 1.7 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा आकडा सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी, RRR ने 24 तासांत 51.12 मिलियन व्ह्यूज मिळवले होते. तर 'आदिपुरुष'ने अवघ्या 8 तासांत 53.40 मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.
लाइक्सच्या बाबतीतही 'आदिपुरुष' आघाडीवर
व्ह्यूजसोबतच 'आदिपुरुष'चा ट्रेलर लाइक्सच्या बाबतीतही खूप पुढे आहे. अवघ्या 5 मिनिटांत ट्रेलरला 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यापूर्वी हा विक्रम 'केजीएफ चॅप्टर 2' च्या नावावर होता.
अल्पावधीत 100K लाइक्सचा टप्पा ओलांडणारे चित्रपट
चित्रपट | मिनिटे |
आदिपुरुष | 5 मिनिटे |
KGF चॅप्टर 2 | 16 मिनिटे |
राधे श्याम | 29 मिनिटे |
साहो | 52 मिनिटे |
RRR | 58 मिनिटे |
या चित्रपटाबद्दल चाहत्यांनी व्यक्त केली उत्सुकता
ट्रेलर समोर आल्यापासून प्रभासचे चाहते खूप उत्सुक आहेत. हा विक्रम मोडल्याबद्दल ते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. मात्र काहींच्या मते, प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत प्रभासपेक्षा हृतिक रोशन किंवा जूनियर एनटीआर अधिक चांगला शोभून दिसला असता.
ट्रेलरला चाहत्यांकडून मिळतोय सकारात्मक प्रतिसाद
या बहुप्रतिक्षित चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गाण्याची पार्श्वभूमी, पात्रे आणि व्हीएफएक्सवर चाहते समाधानी आहेत. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- 'जेव्हा एखादा चित्रपट निर्माता तुमच्या फीडबॅककडे लक्ष देतो आणि प्रेक्षकांचा विचार करून काम करतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आदिपुरुषच्या संपूर्ण टीमला यश मिळो हीच प्रार्थना.'
आणखी एका चाहत्याने लिहिले- 'केवळ तेलुगुच नाही तर हिंदी प्रेक्षकांनाही प्रभास खूप आवडतोय.' तर आणखी एकाने लिहिले, 'प्रभास रेकॉर्ड तोडत नाही, पण तो रेकॉर्ड प्रस्थापित करतो. त्याला एका तासात 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.' एकाने लिहिले, 'जय श्री राम, मनोज मुंतशिर आणि शरद केळकर यांनी उत्तम काम केले आहे.'
वाईटरित्या ट्रोल झाला होता 'आदिपुरुष', बंदी घालण्याची करण्यात आली होती मागणी
गेल्या वर्षी निर्मात्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर अयोध्येत 'आदिपुरुष'चा भव्य टिझर लाँच केला होता. मात्र या टिझरला प्रेक्षकांची पसंती मिळण्याऐवजी त्याला ट्रोल केले गेले. पात्रांच्या खराब लूकमुळे आणि व्हीएफएक्समुळे हा चित्रपट चेष्ठेचा विषय ठरला होता. तसेच या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सर्व वादग्रस्त दृश्ये निर्मात्यांनी काढून टाकली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.