आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण' च्या सेटवर राडा:शाहरुखच्या चित्रपटाच्या सेटवर असिस्टंटने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या थोबाडीत मारली, आदित्य चोप्राने स्टुडिओची सुरक्षा वाढवली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोव्हेंबर 2020 मध्ये शाहरुख खानचा हा फोटो यशराज स्टुडिओच्या बाहेर क्लिक करण्यात आला होता. हा त्याचा 'पठाण' चित्रपटातील लूक असल्याचे म्हटले जाते. - Divya Marathi
नोव्हेंबर 2020 मध्ये शाहरुख खानचा हा फोटो यशराज स्टुडिओच्या बाहेर क्लिक करण्यात आला होता. हा त्याचा 'पठाण' चित्रपटातील लूक असल्याचे म्हटले जाते.
  • जाणून घ्या 'पठाण'च्या सेटवर नेमके काय घडले?

अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या सेटवर भांडण झाल्याचे वृत्त आहे. एका सहाय्यक दिग्दर्शकाने 'पठाण'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या थोबाडीत मारल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना निर्माता आदित्य चोप्राने गांभीर्याने घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राने यशराज स्टुडिओची सुरक्षा कडक केली आहे. त्याचबरोबर सेटवर घडलेल्या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

यापूर्वी सेटवर असे कधीच घडले नव्हते

'स्पॉटबॉय'ने आदित्य चोप्राच्या जवळच्या मित्राच्या हवाल्याने लिहिले, "त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर अशी अप्रिय घटना याआधी कधीही घडली नव्हती. विशेषत: शाहरुख खानच्या चित्रपटाच्या सेटवर तर कधीच नाही. आदित्य चोप्रा यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घातले असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत."

निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'सलाम नमस्ते', 'ता रा रम पम', 'बच्चना ए हसीनो' आणि 'वॉर' या चित्रपटांच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे.
निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'सलाम नमस्ते', 'ता रा रम पम', 'बच्चना ए हसीनो' आणि 'वॉर' या चित्रपटांच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे.

याच रिपोर्टमध्ये असेही लिहिले आहे की, या घटनेपासून शाहरुख सेटवरील महिलांच्या सुरक्षेची चिंता करत आहे. मित्राच्या म्हणण्यानुसार, आदित्य चोप्रांनी त्याला सांगितले की, "सेटवर लोकांमध्ये ते कोणत्याही प्रकारचे भांडण झालेले बघू शकत नाही."

'पठाण'च्या सेटवर नेमके काय झाले?

बुधवारी, मीडिया आणि सोशल मीडियामध्ये दिवसभर अशी बातमी समोर आली होती की, एका सहाय्यक दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक सिद्धार्थच्या कानशिलात लगावली होती. असे सांगितले जाते की, हा सहाय्यक सेटवर नो कॅमेरा, नो मोबाईलच्या नियमांचे उल्लंघन करत होता. सिद्धार्थने त्याला टोकल्यानंतरही त्याने त्याचे ऐकले नाही. उलट त्याने सिद्धार्थला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. रागात सिद्धार्थने त्याला चापट मारली तेव्हा त्यानेही सिद्धार्थवर हात उगारला.

सहाय्यक दिग्दर्शकाला नोकरीवरून काढून टाकले

या घटनेनंतर शूटिंग एका दिवसासाठी थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सहाय्यक दिग्दर्शकाला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असून पठाण हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होऊ शकतो. यापूर्वी तो आनंद एल राय यांच्या 'झिरो' (2018) मध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...