आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गोल्डन ज्युबली सेलिब्रेशन:YRF ला 50 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने आदित्य चोप्रा करणार ग्रॅण्ड सेलिब्रेशन, भारताच्या 22 भाषांमध्ये रिलीज करणार कंपनीचा नवीन 'लोगो'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वायआरएफ या कंपनीचा जुना इतिहास आहे.

यशराज फिल्म्सला लवकरच 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने आदित्य चोप्राने मोठ्या जल्लोषात तो साजरा करण्याची तयारी केली आहे. 27 सप्टेंबर रोजी दिवंगत यश चोप्रा यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त ते 'वायआरएफ प्रोजेक्ट 50' चा ब्लू प्रिंट रिलीज करणार आहेत. यासोबतच ते आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या नवीन लोगोचेही अनावरण करणार आहेत.

व्यापार पंडित म्हणाले की, वायआरएफ ही एक अशी कंपनी आहे, ज्याचा जुना इतिहास आहे. त्यांच्या लायब्ररीत आयकॉनिक चित्रपटांची संख्या बरीच आहे. कंपनीने भारताला अनेक सुपरस्टार्स दिले आहेत. असेही ऐकिवात आहे की, नवीन 'लोगो' भारताच्या सर्व अधिकृत भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ शकतो.

हा भव्य लोगो लाँच करण्यामागील कारण स्पष्ट करताना सूत्राने सांगितले, 'वायआरएफ गेल्या 50 वर्षांपासून अखिल भारतीय तत्वावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या चित्रपटांनी भाषेच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण देशाचे मनोरंजन केले आहे. या कारणास्तव, आम्ही भारताच्या सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये लोगो प्रदर्शित होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकतोय. यात जर सत्य असेल तर प्रत्येक राज्यात वायआरएफचे चित्रपट पसंत करणा-या प्रेक्षकांचे आभार मानण्याचे हे चांगले संकेत असतील.'