आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि गायक व होस्ट आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध झाला. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यसरकारच्या नियमावलीनुसार लग्नाला 50 पाहुणेच उपस्थित राहू शकतात. या सगळ्या नियमांचे पालन करून आदित्य- श्वेताने इस्कॉन मंदिरात लग्न केले. लग्नानंतर 2 डिसेंबर रोजी वेडिंग रिस्पेशनही झाले, त्याला बॉलिवूडमधील कलाकारमंडळींनी हजेरी लावून नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितले गेले.
आता आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात तो आपल्या पत्नीला चक्क माहेरी पाठवण्याची धमकी देतोय. या व्हिडिओत आदित्यसह श्वेता आणि त्याची आईदेखील दिसत आहे.
झाले असे की, श्वेता अग्रवाल आदित्यच्या आईसोबत किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. तिथे उभा असलेला आदित्य जेवणाच्या चवीवरुन तिची मस्करी करतोय. आदित्य धमकी देण्याच्या आवेशात श्वेताला म्हणतो, ‘जेवणात काही कसर राहिली तर तुला सासरी पाठवून देऊ’. खरंतर त्याला माहेरी म्हणायचे असते. हे ऐकून श्वेता हसायला लागते. ती म्हणते, ‘हे तर माझे सासरच आहे. तुला माहेरी म्हणायचे आहे का?’ आणि सगळेच हसायला लागतात. आदित्य आणि श्वेताच्या या मजेशीर व्हिडिओवर लोकांच्या भरपूर कमेंट्सही येत आहेत.
लग्नानंतर आता वेगळ्या घरात होणार शिफ्ट
आदित्य आणि श्वेता लकरच नवीन घरात रहायला जाणार आहेत. आदित्यने श्वेतासाठी 5 बीएचकेचा एक सुंदर फ्लॅट विकत घेतला आहे. आदित्यने सांगितल्यानुसार, 'अंधेरी परिसरात मी 5 बीएचकेचा एक फ्लॅट विकत घेतला आहे. हा फ्लॅट माझ्या आई- वडिलांच्या घरापासून फक्त तीन इमारती सोडून आहे. तीन- चार महिन्यांनी आम्ही त्या घरी रहायला जाऊ.'
या फ्लॅटची किंमत 4 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आदित्य आणि श्वेताची भेट 10 वर्षांपूर्वी 'शापित' सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. आणि आता आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.