आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदित्य-श्वेताचे लग्न:उदित नारायण यांच्या मुलाच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू, सोशल मीडियावर व्हायरल झाला रोका सेरेमनीचा फोटो

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या रोका सेरेमनीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. बुधवारी आदित्य आणि श्वेता यांच्या रोका सेरेमनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात हे दोघेही आपल्या पालकांसोबत दिसत आहेत. जवळजवळ दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या जोडप्याने अलीकडेच आपल्या लग्नाची घोषणा केली.

डिसेंबरमध्ये आदित्य-श्वेताचे लग्न होणार आहे
मंगळवारी आदित्यने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "आम्ही लग्न करत आहोत. श्वेताला माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझी सोलमेट, 11 वर्षांपूर्वी आणि आता शेवटी आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत. आम्हा दोघांनाही आमच्या खासगी आयुष्याविषयी बोलणे फारसे आवडत नाही. लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून काही काळासाठी ब्रेक घेतोय. डिसेंबरमध्ये भेटू", अशा आशयाची पोस्ट आदित्यने शेअर केली होती.

आपल्या मुलाचा निर्णय ऐकून हैराण झाले होते उदित
दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणात उदित नारायण म्हणाले की, "मला आठवते आदित्य 31 ऑगस्टला माझ्याकडे आला आणि म्हणाले की पप्पा मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून मी हैराण झालो. परंतु मी त्याला बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आदित्यने मला श्वेताबद्दल सांगितले की, तो तिला 10 वर्षांपासून ओळखतो आणि तिला आपला जोडीदार बनवू इच्छितो. मी त्याला फक्त एक गोष्ट म्हटली. ती म्हणजे भविष्यात काही घडल्यास पालकांना दोष देऊ नको."

आदित्य आणि श्वेताने 2010 मध्ये आलेल्या 'शापित' चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते आणि येथूनच त्यांच्या नात्यास सुरुवात झाली. एका मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, जेव्हा त्याने 'शापित' चित्रपटाच्या सेटवर श्वेताला लंच डेटसाठी विचारले होते, तेव्हा तिने त्याची ऑफर नाकारली होती.

दिवाळखोर असल्याचे विधान करून आदित्य चर्चेत आला होता
गेल्या महिन्यात माध्यमात एक आदित्यची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली होती. यात त्याने स्वतःला दिवाळखोर झाल्याचे सांगितले होते. लॉकडाऊनमध्ये आपली संपूर्ण सेव्हिंग खर्च झाली असून खात्यात केवळ 18 हजार रुपये शिल्लक आहेत, असे आदित्यने म्हटले होते. मात्र दिव्य मराठीसोबत खास संभाषणात आदित्यने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, त्याने हे विधान गमतीने केले होते. आदित्यच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे पैशांची आणि कामाची कमतरता नाही.