आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटो-व्हिडिओ इनसाइड:आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या लग्न विधींना सुरुवात,  उद्या मंदिरात लग्नाच्या बेडीत अडकणार दोघे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य नारायणच्या फॅन पेजवर या सोहळ्याची झलक बघायला मिळत आहे.

गायक, होस्ट आणि अँकर आदित्य नारायण 1 डिसेंबरला गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. हे दोघे मुंबईतील एका मंदिरात लग्न करणार आहेत, ज्यात फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रविवारी आदित्यच्या घरी या दोघांचा तिलक सोहळा ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

आदित्य नारायणच्या फॅन पेजवर या सोहळ्याची झलक बघायला मिळत आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून स्टेजवर आदित्य आणि श्वेतासह उदित नारायण आणि त्यांच्या पत्नी दिसत आहेत.

या सोहळ्यादरम्यान आदित्यने गडद निळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे, तर श्वेता अग्रवालने केशरी लेहेंगा परिधान केलेला आहे. एका फॅमिली फोटोत आदित्य आणि श्वेता त्याच्या आईवडिलांसह दिसत आहे.

1 डिसेंबर रोजी मंदिरात होईल लग्न
आदित्य आणि श्वेता 1 डिसेंबर रोजी मुंबईतील एका मंदिरात सप्तपदी घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लग्नात फक्त 50 लोक सहभागी होणार आहेत.

2 डिसेंबर रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शन होईल
अलीकडेच कोइमोई वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितले आहे की, दोघांच्या लग्नानंतर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटी यात सामील होणार आहेत.

4 नोव्हेंबर रोजी झाली होती रोका सेरेमनी
महिन्याभरापूर्वी आदित्यने लेडी लव्ह श्वेताबरोबरचे एक छायाचित्र शेअर करुन लग्नाची बातमी दिली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी दोघांची रोका सेरेमनी झाली होती. त्यात या दोघांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser