आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि अभिनेता, गायक व शो होस्ट आदित्य नारायण याने 1 डिसेंबर रोजी प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न केले. लग्नानंतर आता आदित्य आणि श्वेता नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे वृत्त आहे. लग्नाआधीच आदित्यने मुंबईत 5 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. आदित्यच्या या नवीन घराची किंमत चार कोटी रुपये असल्याचे माध्यमांमध्ये समोर आले होते. पण आदित्यने आता आपल्या या नवीन घराची किंमत सांगितली आहे. माझ्या फ्लॅट विकत घेण्याच्या क्षमतेला माध्यमांनी कमी लेखल्याचे आदित्यने एका मुलाखतीत म्हटले आहे.
‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, “फक्त चार कोटी? इतक्या कमी किंमतीत मी घर विकत घेईन का? बाजारभावापेक्षा तुम्ही कमी किंमत सांगितली. मी तो फ्लॅट साडेदहा कोटी रुपयांना विकत घेतला. मी लहान असल्यापासून इंडस्ट्रीत काम करतोय आणि टेलिव्हिजन मला माझ्या कामाचा मोबदला खूप चांगला देते”, असे आदित्य म्हणाला आहे.
आदित्यचे हे नवीन घर त्याच्या आईवडिलांच्या घरापासून तीन इमारती सोडून आहे. “मी अंधेरीतच 5 बीएचके फ्लॅट घेतला आहे. पुढील तीन-चार महिन्यांत आम्ही तिथे राहायला जाऊ”, असे त्याने सांगितले.
आदित्यने सांगितल्यानुसार, या घरासाठी त्याने बरीच बचत आधीच करून ठेवली होती. दरम्यान, आदित्य आणि श्वेताची भेट 10 वर्षांपूर्वी 'शापित' सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 10 वर्षांनी दोघांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यसरकारच्या नियमांवलीनुसार लग्नाला 50 पाहुणेच उपस्थित राहू शकतात. या सगळ्या नियमांचे पालन करून आदित्य- श्वेताने मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न थाटले. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी मुंबईतील पंचातारांकित हॉटेलमध्ये त्यांचे वेडिंग रिसेप्शन पार पडले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.