आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After Neha Kakkar, Now Aditya Narayan Confirms The News Of His Marriage To His Girlfriend, Has Been Dating Shweta Aggarwal Shaapit Actress For The Last 10 Years.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग बेल्स:गर्लफ्रेंडसोबत लग्न थाटणार आहे आदित्य नारायण, अभिनेत्री श्वेता अग्रवालला मागील 10 वर्षांपासून करतोय डेट

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य आणि श्वेता 2010 मध्ये आलेल्या ‘शापित’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

लोकप्रिय गायिका नेहा कक्करने नुकतीच रोहन प्रीत सिंगसोबत लग्नाची घोषणा करून सर्वांना चकित केले. 23 ऑक्टोबरला नेहा दिल्लीत लग्न करणार आहे. तर दुसरीकडे इंडियन आयडॉलचा होस्ट आणि गायक आदित्य नारायण यानेही लग्न करणआर असल्याचे सांगितले आहे. आदित्य यावर्षी आपली लाँगटाइम गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे. आदित्य आणि श्वेता 2010 मध्ये आलेल्या ‘शापित’ या चित्रपटात एकत्र दिसले होते, त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

श्वेता अग्रवालशी लग्न करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना आदित्य नारायणने ई-टाईम्सला सांगितले की, 'श्वेताला मी शापित चित्रपटाच्या सेटवर भेटलो आणि अगदी पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांना आवडू लागलो. हळू हळू मला जाणवलं की मी तिच्या प्रेमात पडलोय. त्यानंतर मी तिच्याशी बोलू लागलो. सुरुवातीला तिला फक्त मैत्री करायची होती कारण त्यावेळी आम्ही खूप लहान होतो आणि आम्हाला करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती.'

नात्यात बरेच चढ-उतार आले

आदित्य पुढे सांगतो, 'प्रत्येक नात्याप्रमाणेच गेल्या 10 वर्षांत आमच्या नात्यातही अनेक चढ-उतार आले आहेत. विवाह ही केवळ आमच्यासाठी औपचारिकता आहे. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करु. माझे आई-वडील श्वेताला ओळखतात आणि त्यांना ती खूप आवडते. श्वेतामध्ये मला सोल-मेट मिळाली याचा मला आनंद आहे.'

आदित्य नेहा कक्करच्या लग्नात सहभागी होणार नाही
खांद्याच्या दुखापतीमुळे आदित्य नारायण त्याची जवळची मित्र नेहा कक्कड याच्या लग्नात सहभागी होणार नाहीत. काही महिन्यांपूर्वी आदित्य आणि नेहाच्या नात्याबद्दलही चर्चा होती मात्र नंतर इंडियन आयडॉल या शोसाठी तो पब्लिसिटी स्टंट होता, हे उघड झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser