आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायणला याकाळात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. स्वतः आदित्यने याचा खुलासा केला आहे. आदित्यच्या म्हणण्यानुसार, त्याच्या बँक खात्यात केवळ 18 हजार रुपये शिल्लक आहेत आणि जर त्याने ऑक्टोबरमध्ये काम सुरू केले नाही तर जगण्यासाठी त्याला सामान विकावे लागेल.
'माझी सर्व बचत संपली'
बॉलिवूड बबलशी बोलताना आदित्य म्हणाला - ''जर सरकारने लॉकडाऊन वाढवले तर लोक उपाशी मरतील. माझी संपूर्ण बचत संपली आहे. मी म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे गुंतवले होते, ते संपूर्ण पैसे उदरनिर्वाहासाठी मला काढावे लागले. वर्षभर काम करणार नाही, असा विचार मी केला नव्हता. अशा प्रकारच्या योजना कुणी आखत नाही. आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. माझ्या खात्यात फक्त 18 हजार रुपये शिल्लक आहेत,'' असे आदित्यने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ''जर मी ऑक्टोबरमध्ये काम सुरू केले नाही तर माझ्याकडे एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. गरजेसाठी मला माझी बाइक किंवा इतर सामान विकावे लागले. अतिशय कठीण काळ आहे. शेवटी, आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. जेव्हा आपण कठीण निर्णय घेता, तेव्हा लोकांचा एक गट असतो जो तुमचे निर्णय चुकीचे आहे, असे म्हणतो.''
अलीकडेच लग्नाची घोषणा केली होती
आदित्य नारायणने अलीकडेच अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. लग्नाच्या वृत्ताला दुजोरा देताना आदित्य नारायणने ई-टाईम्सला सांगितले होते की, 'श्वेताला मी शापित चित्रपटाच्या सेटवर भेटलो आणि अगदी पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांना आवडू लागलो. हळू हळू मला जाणवलं की मी तिच्या प्रेमात पडलोय. त्यानंतर मी तिच्याशी बोलू लागलो. सुरुवातीला तिला फक्त मैत्री करायची होती कारण त्यावेळी आम्ही खूप लहान होतो आणि आम्हाला करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती.'
नात्यात बरेच चढ-उतार आले
आदित्यने सांगितल्यानुसार, 'प्रत्येक नात्याप्रमाणेच गेल्या 10 वर्षांत आमच्या नात्यातही अनेक चढ-उतार आले आहेत. विवाह ही केवळ आमच्यासाठी औपचारिकता आहे. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करु. माझे आई-वडील श्वेताला ओळखतात आणि त्यांना ती खूप आवडते. श्वेतामध्ये मला सोल-मेट मिळाली याचा मला आनंद आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.