आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध गायक आदित्य नारायणची एक मुलाखत माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या दिवाळखोरीबद्दल सांगितले होते. लॉकडाऊनमध्ये आपली सर्व बचत संपली असून केवळ 18 हजार रुपये बँक खात्यात शिल्लक असल्याचे त्याने म्हटले होते. इतकेच नव्हे तर ऑक्टोबरमध्ये काम मिळाले नाही तर जगण्यासाठी आपले सामान आणि बाइक विकावी लागेल, असेही तो म्हणाला होता. ही बातमी व्हायरल झाल्यावर आदित्य आणि त्याचे वडील उदित नारायण यांनी दिव्य मराठीसोबतच्या बातचीतमध्ये स्पष्टीकरण दिले. उदित नारायण यांनी सांगितल्यानुसार, आदित्यने गमतीत हे विधान केले.
'बातमी वाचल्यानंतर मी हसू आवरु शकलो नाही'
उदित नारायण म्हणतात- जेव्हा मला माझ्या मुलाच्या दिवाळखोरीची बातमी समजली तेव्हा विश्वास ठेवा, मी माझे हसू आवरु शकलो नाही. आदित्य हा आपल्या देशाचा अव्वल अँकर आहे. त्याच्याकडे पैशाची कमतरता कशी असू शकते? त्याने बरीची कमाई केली आहे, दिवाळखोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. सोशल मीडियाच्या युगात अशा गोष्टी पसरतात,' असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, 'कदाचित आदित्य काहीतरी वेगळे बोलला असावा आणि कुणीतरी काहीतरी वेगळे लिहिले असावे. माझा मुलगा त्याच्या करिअरमध्ये खूप चांगले काम करत आहे आणि जर काही कमी जास्त झाले तर त्याचे वडील अजूनही जिवंत आहेत. आयुष्यात खूप कष्ट करून मी जे काही कमावले ते सर्व आदित्यसाठी आहे.'
"या बातमीचा वधू पक्षावर काय परिणाम होईल?"
उदित पुढे म्हणाले- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आदित्यचे लग्न ठरले आहे. अशा बातम्या वाचल्यानंतर मुलीवर आणि तिच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार करा. ते लग्न करण्यास नकार देतील. जेव्हा आदित्यकडे पैसे नसतील तर तो त्या मुलीची जबाबदारी कशी घेईल. माझ्या मुलाने मला किंवा त्याच्या आईला कधीही त्याच्याकडे पैसे नाहीत असे सांगितले नाही. त्याच्याकडे बरेच काम आहे. त्याच्याकडे पैसे नाहीत असे घडूच शकत नाही. या सर्व गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले. मी आशा करतो की लोक याकडे गांभीर्याने बघणार नाहीत.'
आदित्य म्हणाला - मी गमतीने म्हणालो होतो
आदित्य नारायणने कबूल केले की त्याने गमतीने आपण दिवाळखोर झाल्याचे म्हटले होते. पण हे सर्व अशा पद्धतीने समोर येईल, याची कल्पना केली नसल्याचे तो म्हणाला. त्याने सांगितले, जेव्हापासून ही बातमी आली आहे तेव्हापासून मला सतत फोन कॉल येत आहेत. बरेच लोक माझ्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
आदित्य पुढे म्हणाला, ''या बातमीत काही तथ्य नाही, एवढेच मी सांगू इच्छितो. सुमारे एक महिन्यापूर्वी एका मुलाखतीत मी लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांना भेडसावत असलेल्या समस्यांविषयी बोललो होतो. मुलाखतीत लॉकडाऊनमुळे सेलिब्रिटींचेही नुकसान होत असून आम्हाला काम मिळण्यात अडचण येत असल्याचे मी म्हणालो होतो. बोलण्याबोलण्यात मी म्हणालो होतो की, माझ्या खात्यात थोडेच पैसे शिल्लक आहेत. मलाही घराचा ईएमआय द्यावा लागतो. मी देखील दिवाळखोर झालोय. पण मला माहित नव्हते की ते इतके मोठे केले जाईल.''
''एक महिन्यानंतर माझे लग्न आहे. मी असे बोलण्याचा विचारही करू शकत नाही. देवाच्या आशीर्वादाने माझे करिअर उत्तम सुरु आहे आणि याक्षणी माझ्याकडे पैशांची कमतरता नाही,'' असे आदित्यने स्पष्ट केले.
व्हायरल झालेल्या मुलाखतीत काय म्हणाला होता आदित्य?
बॉलिवूड बबलशी बोलताना आदित्य म्हणाला - ''जर सरकारने लॉकडाऊन वाढवले तर लोक उपाशी मरतील. माझी संपूर्ण बचत संपली आहे. मी म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे गुंतवले होते, ते संपूर्ण पैसे उदरनिर्वाहासाठी मला काढावे लागले. वर्षभर काम करणार नाही, असा विचार मी केला नव्हता. अशा प्रकारच्या योजना कुणी आखत नाही. आता माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. माझ्या खात्यात फक्त 18 हजार रुपये शिल्लक आहेत,'' असे आदित्यने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ''जर मी ऑक्टोबरमध्ये काम सुरू केले नाही तर माझ्याकडे एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. गरजेसाठी मला माझी बाइक किंवा इतर सामान विकावे लागले. अतिशय कठीण काळ आहे. शेवटी, आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. जेव्हा आपण कठीण निर्णय घेता, तेव्हा लोकांचा एक गट असतो जो तुमचे निर्णय चुकीचे आहे, असे म्हणतो.''
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.