आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग बेल्स:आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेताबरोबरचा पहिला फोटो शेअर करुन सोशल मीडियापासून काही काळ दूर होण्याची केली घोषणा, डिसेंबरमध्ये आहे लग्न

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डिसेंबर महिन्यात आदित्य श्वेतासोबत लग्न करतोय.

प्रसिद्ध गायक आदित्य नारायणने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबतचा फोटो शेअर करुन पुढील महिन्यात लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. ‘शापित’ या चित्रपटाच्या दरम्यान श्वेता आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हे दोघे मागील दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • आदित्यने लिहिले- खासगी आयुष्याविषयी बोलायला आवडत नाही

आदित्यने आपल्या पोस्टमध्ये लिहिले- ''आमचे लग्न होणार आहे. श्वेता माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझी सोलमेट, 11 वर्षांपूर्वी आणि आता आम्ही डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत. आम्हा दोघांनाही आपल्या खासगी आयुष्याविषयी बोलायला आवडत नाही. लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून काही काळासाठी ब्रेक घेतोय. डिसेंबरमध्ये भेटू'', असे आदित्य म्हणाला.

  • श्वेताने इंडस्ट्रीत केले आहे काम

श्वेताने बर्‍याच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'शगुन', 'देखो मगर प्यार से', आणि 'बाबुल की दुआएं लेती जा' या मालिकांमध्ये ती झळकली. याशिवाय तिने प्रभास आणि कीच्चा सुदीप सारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. आदित्यने सांगितल्यानुसार, 'शापित'च्या शूटिंग दरम्यान श्वेताने त्याची लंच डेटची ऑफर नाकारली होती.