आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उदित नारायण यांच्या मुलाचे लग्न:आदित्यच्या लग्नात उदित नारायण यांनी धरला ताल, काही वेळातच इस्कॉन मंदिरात होणार लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज आदित्य आणि श्वेता लग्नगाठीत अडकणार आहेत.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध होतोय. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आदित्य वडील उदित नारायण यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. आदित्यची आई दीपा नारायण यांनीही मुलाच्या लग्नात डान्स केला.

कोविडमुळे जास्त लोकांना आमंत्रण नाही
या फोटोत आदित्य आणि श्वेता मॅचिंग कलरचा वेडिंग अटायरमध्ये दिसत आहेत. दोघे काही वेळातच मुंबईतील इस्कॉन मंदिरात विवाहबद्ध होणार आहेत. कोरोना गाइडलाइन अंतर्गत या लग्नात वर आणि वधूच्या कुटुंबीयांसह फक्त 50 लोक सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आदित्य म्हणाला होता, 'कोविड 19 मुळे आम्ही लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करत आहोत. कारण महाराष्ट्रात लग्नात फक्त 50 पाहुण्यांना बोलवण्याची परवानगी आहे. त्यामुळे हे लग्न मंदिरात होणार असून त्यानंतर एक छोटे रिसेप्शन होईल.'

2 डिसेंबर रोजी होईल रिसेप्शन
उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न धुमधडाक्यात करायचे होते. मात्र कोरोनामुळे हे शक्य नाही. पण रिसेप्शन ग्रॅण्ड करणार असल्याचे ते म्हणाले होते.

आदित्यच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

सोशल मीडियावर केली होती लग्नाची घोषणा
3 नोव्हेंबर रोजी आदित्यने सोशल मीडियावर लग्नाची घोषणा केली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'आम्ही लग्न करत आहोत. श्वेता माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो. माझी सोलमेट. 11 वर्षांपूर्वी आणि आता आम्ही अखेर डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहोत.' अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser