आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:आदित्य नारायणने सांगितले आपल्या मुलीचे नाव, फोटो शेअर करून सांगितली 'ही' गोष्ट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्यने सांगितले मुलीचे नाव

गायक आणि होस्ट आदित्य नारायण नुकताच एका मुलीचा बाबा झाला आहे. जेव्हापासून आदित्यच्या चाहत्यांना ही गोड बातमी कळली तेव्हापासून प्रत्येकजण त्याच्या लेकीचे नाव जाणून घेण्यासाठी आणि तिची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र आदित्यने अद्याप चाहत्यांना मुलीची झलक दाखवली नसली तरी तिचे नाव मात्र सांगितले आहे. सोशल मीडियावर मुलीच्या नावाचे वर्णन करताना आदित्यने सांगितले की, जेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब मुलाचे नाव शोधत होते, तेव्हा तो इंटरनेटवर मुलीसाठी नावाच्या शोधात होता.

आदित्यने सांगितले मुलीचे नाव
आदित्यने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी चॅट सेशन ठेवले होते. यादरम्यान एका चाहत्याने त्याला त्याच्या मुलीचे नाव विचारले. यावर आदित्यने सांगितले की, त्याने आपल्या मुलीचे नाव त्विषा नारायण झा असे ठेवले आहे. पुढे आदित्यने सांगितले की, "संपूर्ण कुटुंबात मी एकमेव व्यक्ती होतो जो मुलीसाठी नाव शोधत होतो. तर प्रत्येकजण मुलासाठी नाव शोधत होता."

आदित्यला वाटत होते की त्याला मुलगीच होईल
आदित्यने एका मुलाखतीत सांगितले की, "प्रत्येकजण मला म्हणत होता की बेबी बॉय येईल, पण कुठेतरी मला आशा होती की मी एका मुलीचा बाप होईल. मुली नेहमी त्यांच्या वडिलांच्या जवळ असतात आणि मला खूप आनंद होतोय की माझ्या घरी लिटिल एंजल आली आहे. श्वेता आणि मी खूप भाग्यवान आहोत की आम्ही पालक झालो आहोत. श्वेताबद्दल माझे प्रेम आणि आदर द्विगुणित झाला आहे. जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणेच्या टप्प्यात असते आणि मुलाला जन्म देते तेव्हा तिला बर्‍याच गोष्टींचा सामना करावा लागतो." श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईतील एका रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला.

1 डिसेंबर 2020 रोजी झाले लग्न
आदित्य आणि श्वेता दोन वर्षांपूर्वी 1 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकले होते. आपल्या लग्नाची बातमी जाहीर करताना आदित्यने लिहिले होते की, "आम्ही लग्न करणार आहोत. मी भाग्यवान आहे की श्वेता माझ्या आयुष्यात आहे. माझी सोबती, 11 वर्षांपूर्वी आणि आता आम्ही शेवटी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहोत. आम्ही दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवण्याला प्राधान्य देतो. लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये भेटेन."

बातम्या आणखी आहेत...