आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध होतोय. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत आदित्य आणि श्वेता मॅचिंग कलरचा वेडिंग अटायरमध्ये दिसत आहेत. दोघे काही वेळातच मुंबईतील इस्कॉन मंदिरात विवाहबद्ध होणार आहेत. कोरोना गाइडलाइन अंतर्गत या लग्नात वर आणि वधूच्या कुटुंबीयांसह फक्त 50 लोक सहभागी होणार आहेत. लग्नात उपस्थित सर्वजण मास्क लावून दिसत आहेत. आदित्य प्रमाणेच वधू श्वेताचादेखील पहिला फोटो समोर आला आहे. यात ती ऑफ व्हाइट लहेंग्यात दिसत आहे.
विशेष म्हणजे आज उदित नारायण यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. आदित्यने या खास दिवसाची निवड लग्नासाठी केली आहे.
कोण आहे श्वेता अग्रवाल?
‘शपित’ या चित्रपटाच्या सेटवर श्वेता आणि आदित्यचे सूत जुळले होते. हे दोघे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्वेताने बर्याच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने शगुन, देखो मगर प्यार से, आणि बाबुल की दुआएं लेती जा मध्ये काम केले आहे. याशिवाय तिने प्रभास आणि कीचा सुदीप सारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.