आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

56 वर्षांचा झाला आदित्य पांचोली:वादग्रस्त आहे आदित्य पांचोलीचे खासगी आयुष्य, कंगना रनोटला मारहाण केल्यापासून ते मोलकरणीवर बलात्काराचा लागला आरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य पांचोलीचे नाव नेहमी वादांशी जोडले गेले आहे.

अभिनेता आदित्य पांचोली आज 56 वर्षांचा झाला आहे. 4 डिसेंबर 1965 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. आदित्याने अनेक सिनेमांत काम केले आहे, परंतु तो फिल्म करिअरपेक्षा वादाने सर्वाधिक चर्चेत राहतो. जाणून घेऊया आदितशी निगडीत काही वाद...

पबमध्ये मारहाण
आदित्य पांचोलीने 'लाखो यहां दिलवाले' चित्रपटाच्या सेटवर को-स्टार विजे भाटियाच्या श्रीमुखात भडकवली होती. याआधी मार्च 2014 मध्ये एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या पबमध्ये मारहाण केल्याने आदित्यला अटक झाली होती. आदित्यने मुबंईतील जुहूस्थित एका हॉटेलच्या पबमधील बाउंसरला मारहाण केली होती. पबमध्ये हिंदी गाणी न वाजवल्याने आदित्य नाराज झाला होता.

जिया खानच्या आईविरोधात खटला
2013 मध्ये दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबियाविरोधात 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटला दाखल केला होता. आदित्यने राबिया यांच्यावरच जियाच्या हत्येचा आरोप लावत नवीन वादाला तोंड फोडले होते. राबिया यांनी आपल्यावर लावलेल्या आरोपांमुळे आपली प्रतीमा मलिन होत असल्याचे सांगून त्याने 50 कोटींची भरपाईची मागणी केली होती. या व्यतिरिक्त आदित्यने राबियाच्या आरोपांमुळे व्यवसायात तोटा झाल्याने 25 कोटींची मागणी केली होती.

3 जून 2013 रोजी जिया खान तिच्या मुंबईच्या घरी मृतावस्थेत आढळली. जियाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली. यानंतर पोलिसांनी जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जियाचा प्रियकर सूरज पांचोली याला अटक केली होती. मात्र, राबिया यांनी त्यांच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा केला होता.

कंगनासोबतच्या रिलेशनशिपमुळे वादात
आदित्यचे नाव अभिनेत्री कंगना रणोटसोबत जुळले होते. आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या कंगनासोबत आदित्यने खूप दिवस डेटींग केली. कंगनासोबत डेटींग करत असलेल्या आदित्यला तेव्हा दोन मुले होती. दोघांचे नाते संपुष्टात आल्यानंतर आदित्यने स्वत: स्वीकार केले होते, की तो कंगनासोबत रिलेशनशिप होता.

त्याकाळी कंगना इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करत असताना आदित्यने तिला आधार दिला होता. आदित्य कंगनाच्या मेंटॉरच्या भूमिकेत होते. 2017 मध्ये कंगनाने पोलिसांत तक्रार दाखल करुन 13 वर्षांपूर्वी आदित्यने मारहाण केल्याचा आरोप लावला होता. मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये ई -मेलच्या माध्यमातून कंगनाने मारहाण आणि शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे आदित्यने कंगनाचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आणि तिच्यावरोधात एफआयआर दाखल केला होता.

एक्स गर्लफ्रेंड पूजा बेदीच्या मोलकरीणीवर बलात्काराचा आरोप

भांडखोर स्वभावाच्या आदित्यवर बलात्काराचासुध्दा आरोप लागला होता. काही वर्षांपूर्वी आदित्यची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड पूजा बेदीची 15 वर्षीय मोलकरणीने आदित्यवर बलात्काराचा आरोप लावला होता. याविषयी पूजाला जेव्हा माहित झाले तेव्हा तिने आदित्यसोबतचे नाते तोडले होते. मात्र या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या घटनेचा आदित्यच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. त्याला चित्रपटांत फक्त छोट्या भूमिका मिळू लागल्या होत्या.

महिला पत्रकारावर आदित्य पांचोलीने केला होता हल्ला
ऑक्टोबर 2013मध्ये आदित्य पांचोली एका महिला पत्रकारावर हल्ला केल्याने चर्चेत आला होता. एका वृत्त वाहिनीच्या एका महिला पत्रकाराने आदित्यला जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाविषयी प्रश्न विचारल्याने आदित्य तिच्यावर भडकला होता. त्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

एवढेच नव्हे आदित्यने वृत्त वाहिनीच्या टीमसोबत गैरवर्तन करून दार बंद केले होते. त्याने महिला पत्रकाराचा हात दारात अडकवून हातावर वारंवार दार आपटले होते. त्यामुळे महिला पत्रकार जखमी झाली होती. त्यानंतर त्याने मीडियाचा कॅमेरासुध्दा हिसकावून घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...