आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा प्रयोग:आदित्य रॉय कपूर बनला आपली स्वत:ची '3 डी बोलकी बाहुली' असलेला बॉलिवूडचा पहिला अभिनेता, जाणून घ्या याविषयी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून रामदास पाध्ये आणि सत्यजीत पाध्ये यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय.

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या ‘लूडो’ ह्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’ दाखवण्यात आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये यांनी बनवली आहे.

3 डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणतात, “अनुराग बासु यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो, याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.”

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत 53 वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर 'इंडियाज गॉट टॅलेंट', ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शो मध्येही दिसले आहेत.

सत्यजीत सांगतात, "आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन करून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानुसार, आम्ही फायनल 3 डी प्रीटेंड बाहुली तयार केली.'

आदित्यच्या या बाहुलीचं वैशिष्ठ्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक.ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.

ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, “आदित्यच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो. शब्दभ्रमकार बनण्याचे तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शुटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय.“

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभार मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, “या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.”

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser