आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:अदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची सीबीआय चौकशी व्हावी; भाजप नेत्याची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावरुन राजकीय वादंग उठले आहे. यातच आता अदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची सीबीआय चौकशी व्हावी आणि दोन्ही नेत्यांची नार्कोटेस्टही करण्याची मागणी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोपही लावला आहे.

यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून संजय राऊत यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी, सुशांतचे वडील केके सिंह, भाजप आणि बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. याच पार्श्वभूमिवर निखिल आनंद यांनी शिवसेनेवर पलटवार केला.

सीबीआय केंद्राची एजन्सी, गुन्हा दाखल करणे ही त्यांची मजबुरी- संजय राऊत अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करत सुशांतचे वडील के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच एफआयआर दाखल करुन घेणे ही सीबीआयची मजबुरी आहे. सीबीआय ही केंद्र सरकारची एजन्सी आहे. या प्रकरणात बिहार सरकारचा काहीही संबंध नाही, असे राऊत म्हणाले. तर दुसरीकडे सुशांतचे कुटुंबीय राऊत यांच्या आरोपांमुळे संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी: संजय निरुपम

शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले, "शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुशांतच्या कुटुंबाबद्दल बोलत आहेत. प्रत्येक कुटुंबात काही ना काही कहानी असते. शिवसेनेच्याही ब-याच आहेत. पण सुशांतचा मृत्यू हा संवेदनशील विषय आहे. शिवसेनेने यावर संवेदनशीलता दाखवली पाहिजे", असे ट्विट निरुपम यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...