आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:गायिका अफसाना खान लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, म्हणाली - माझ्या आनंदाला सीमा नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफसाना पंजाबमध्ये लग्न करणार आहे

प्रसिद्ध गायिका अफसाना खान लवकरच साजसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अफसानाने तिच्या लग्नाच्या तयारीबद्दल सांगितले. लग्नासाठी मी खूप उत्सुक आहे, असे ती म्हणाली. अफसाना म्हणते, "मी खूप उत्साही आहे, पण खूप काम आहे. मला स्पा करतानाही आराम करता येत नाहीये. मी खूप आनंदी आहे, माझ्या आनंदाला सीमा नाही."

अफसाना पंजाबमध्ये लग्न करणार आहे
अफसाना पुढे म्हणाली, "मी लग्नाबद्दल फार काही उघड करणार नाही, प्रत्येकाने आमचा वेडेपणास स्वतः पाहावा अशी माझी इच्छा आहे. खूप मजा येईल. तुम्ही मला वधूच्या रूपात पहाल आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे." अफसाना पंजाबमध्ये लग्न करणार आहे.

अफसानाच्या चाहत्यांनी तिला पाठवल्या अनेक भेटवस्तू
अफसानाने सांगितले की, तिला चाहत्यांकडून लग्नानिमित्त अनेक भेटवस्तू आल्या आहेत. अफसाना म्हणते, "परफ्यूम, लेहेंगा, मला खूप काही मिळाले आहे. आणि मी कोणालाही निराश करणार नाही. मी सर्वकाही घालेन." अफसानाने तिच्या लग्नात जरीन खान, सलीम-सुलेमान, बी प्राक, जानी, विवेक ओबेरॉय यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना आमंत्रित केले आहे.

अफसाना खान लग्नानंतर लगेच कामाला सुरुवात करणार आहे

जेव्हा अफसानाला तिच्या हनिमूनबद्दल विचारले तेव्हा ती म्हणते, "आमच्याकडे हनिमूनसाठी वेळ नाही. माझे टूर्स बुक झाले आहेत आणि मी खूप बिझी आहे. लग्नाच्या 10 दिवसांनंतरच माझे दिल्ली आणि दुबईमध्ये शो आहेत. त्यामुळे शो आणि हनिमून दोन्ही एकत्रच होईल."

बातम्या आणखी आहेत...