आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना मुंबईत परतली:104 दिवसांनी मुंबईत परतली अभिनेत्री कंगना रनोट, कडक सुरक्षेत विमानतळावर झाली दाखल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती

अभिनेत्री कंगना रनोट एका मोठ्या ब्रेकनंतर मनालीहून मुंबईला परतली आहे. कंगना तिची थोरली बहीण रंगोली आणि भाचा पृथ्वीराज यांच्यासह मुंबई विमानतळावर दिसली. त्यांचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अनेक सुरक्षा रक्षकसुद्धा त्यांच्यासह व्हिडिओमध्ये दिसत आहेत. कंगना 104 दिवसांनी मुंबईला परतली आहे. तत्पूर्वी, शिवसेनेशी झालेल्या वादामुळे कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबई गाठली होती. पाच दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती 14 सप्टेंबरला मनालीला रवाना झाली होती.

9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना तिच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली. एका वक्तव्यात तिने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. मुंबईत आपल्याला सुरक्षित वाटत नाही, असे वादग्रस्त विधान तिने केले होते. तिच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबईतील बर्‍याच लोकांनी निषेध केला होता. शिवाय तिला मुंबईला परत न येण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पुरवलेल्या वाय-प्लस सुरक्षेत ती 9 सप्टेंबरला पाच दिवसांसाठी मुंबईत आली होती.

याचकाळात कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच बीएमसीने तिच्या पाली हिल मधील कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून, मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कुणात दम असेल तर मला अडवून दाखवा.

कंगनाचा 'थलायवी' लवकरच होणार प्रदर्शित
कंगना गेल्या अनेक दिवसांपासून मनालीमध्ये आपल्या कुटूंबियांसह सुट्टीचा आनंद घेत होती. मनाली हे तिचे होम टाऊन आहे. आता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी कंगना मुंबईला परतली आहे. तत्पूर्वी कंगना तिच्या आगामी ‘थलायवी’ (जयललिता यांचा बायोपिक) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. ज्याचे शूटिंग आता पूर्ण झाले असून हा चित्रपट लवकरच हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कंगनाचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
नवीन वर्षात कंगनाच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच तिने सोशल मीडियावर सांगितले होते की, ती तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाची तयारी करत आहे. 2021 च्या जानेवारीच्या सुरुवातीला ती शुटिंगला सुरुवात करणार आहे. या स्पाय थ्रिलर चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाने तिच्या चित्रपटाच्या तयारीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कंगना प्रोस्थेटिक मेजरमेंट देताना दिसली होती. यापूर्वी 'थलायवी' चित्रपटातही कंगनाने ही प्रक्रिया वापरली होती. 'धाकड'च्या तयारीशिवाय कंगना सध्या' तेजस 'चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

बातम्या आणखी आहेत...