आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांनंतर अभिषेक-करिश्माचा साखरपुडा तुटल्याचा खुलासा:दिग्दर्शक सुनील दर्शन म्हणाले - ते दोघे एकमेकांसाठी बनलेले नाही

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर अनेक वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकणार होते. मात्र असे काही झाले की दोघांचे नाते तुटले. मात्र त्यांचे नाते का तुटले हे अजूनपर्यंत कुणालाही कळू शकले नाही. आता अनेक वर्षांनंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर सोबत न राहण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

अभिषेक-करिश्मा एकमेकांसाठी बनले नाही

सुनील म्हणाले की, 'अभिषेक आणि करिश्मा खरोखर एकमेकांसाठी बनलेले नव्हते. तथापि दोघांच्या नात्याविषयीच्या अफवा नव्हत्या तर ते खरे होते. ते लग्न करणार होते.' सोबतच ते म्हणाले की त्यांनी स्वतः अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती, कारण ते कपूर कुटुंबीयांच्या खूप जवळचे आहेत.

सेटवर दोघे खूप भांडायचे

सुनील म्हणाले की, 'मैंने प्यार किया' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मला असे वाटले की हे दोघे एकमेकांसाठी बनलेले नाही. असे यामुळे कारण की ते सेटवर नेहमी भांडायचे. मला आश्चर्य वाटायचे आणि मी विचार करायचो की खरेच हे दोघे एकमेकांसाठी बनले आहेत की नाही. अभिषेक स्वीट आहे आणि करिश्माही चांगली आहे. पण कदाचित नियतीच्या मनात दोघांविषयी वेगळाच विचार होता. 'मैंने प्यार किया' हा एकमेव चित्रपट होता, ज्यात अभिषेक आणि करिश्माने एकत्र काम केले होते.

2002 मध्ये झाला होता अभिषेक-करिश्माचा साखरपुडा

2002 मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवसाला अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. एका कार्यक्रमात जया यांनी करिश्माला सून म्हणूनही हाक मारली होती. मात्र 2003 मध्ये हा साखरपुडा तुटला. माध्यमांतील वृत्तांनुसार लग्नानंतर सुनेने चित्रपटांत काम करू नये अशी जयांची इच्छा होती. मात्र ही अट करिश्मा आणि तिच्या आईला मान्य नव्हती.

2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचा साखरपुडा

करिश्मानंतर अभिषेकचे नाव ऐश्वर्या रायसोबत जोडले गेले. दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना कहो', ' गुरू', 'धूम-2', 'रावण', 'बंटी और बबली'सारख्या अनेक चित्रपटांत सोबत काम केले. 14 जानेवारी 2007 मध्ये साखरपुड्यानंतर 20 एप्रिल 2007 मध्ये दोघांनी मुंबईत लग्न केले. हे बॉलीवूडमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगी झाली. तिचे नाव आराध्या आहे.

बातम्या आणखी आहेत...