आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • After 20 Years Jacky Bhagnani Is Making The Sequel To Rehna Hai Tere Dil Mein, This Remake And Sequel Are Also Is Going To Be Released In 2021

बॉलिवूडमधील रिमेक चित्रपट:20 वर्षांनंतर येतोय 'रहना है तेरे दिल में'चा सिक्वेल, 2021 मध्ये या रिमेक आणि सिक्वेलची मिळणार प्रेक्षकांना ट्रीट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणते आहेत हे चित्रपट जाणून घेऊयात...

2001 मध्ये रिलीज झालेल्या 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाचे निर्माता वासु भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येणार आहे. सिक्वेलमध्ये निर्मात्याला 20 वर्षांनंतरची कहाणी दाखवायची होती. मात्र दीया मिर्झा, आर माधवन आणि सैफ अली खान यांना पुन्हा एकत्र आणणे शक्य होत नाहीये. त्यामुळे नवीन कथा आणि नवीन कलाकारांसह चित्रपट करण्याचा निर्णय जॅकी भगनानीने घेतला असून लीड रोलसाठी कृती सेनॉनचे नाव निश्चित झाले आहे. 2001 मध्ये आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र जेव्हा चित्रपट टीव्हीवर आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

'रहना है तेरे दिल में' या चित्रपटाव्यतिरिक्त यावर्षी अनेक रिमेक व सिक्वेल चित्रपट थिएटरमध्ये येणार आहेत. चला तर मग कोणते आहेत हे चित्रपट जाणून घेऊयात...

'हंगामा 2'

शिल्पा शेट्टी लवकरच 'हंगामा 2' या चित्रपटाद्वारे अभिनयात कमबॅक करणार आहे. या कॉमेडी ड्रामात परेश रावल, मिझान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2003 साली रिलीज झालेल्या 'हंगामा' चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे.

'लालसिंग चड्ढा'

आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा आगामी चित्रपट 'लालसिंग चड्ढा' हा हॉलिवूडच्या गाजलेल्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. 2020 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. 105 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होईल.

'जर्सी'

'अर्जुन रेड्डी' या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक 'कबीर सिंह'नंतर आता 'जर्सी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2019 मध्ये आलेला 'जर्सी' हा दाक्षिणात्य चित्रपट गाजला होता. बर्‍याच दिवसांनी कमबॅक करत असलेल्या एका क्रिकेटरची ही कहाणी आहे. मूळ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता हरीश कल्याण मुख्य भूमिकेत होता. तर हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर लीड रोल साकारतोय.

'रॅम्बो'

सिद्धार्थ आनंदच्या ‘वॉर’नंतर टायगर श्रॉफ लवकरच त्यांच्या 'रॅम्बो'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1982 सालच्या सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या 'रॅम्बो'चा हिंदी रिमेक होणार आहे.

'भूल भुलैय्या 2'

2007 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैय्या'ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. आता कार्तिक आर्यन या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. त्याच्यासोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 2020 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता पण कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. आता हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.

'दोस्ताना 2'

प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी 2008 च्या 'दोस्ताना' या रोमँटिक ड्रामात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा सिक्वेल पुढच्या वर्षी रिलीज होणार असून यात जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवाणी मुख्य भूमिकेत आहेत. धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक कोलिन डिचुन्हा दिग्दर्शित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...