आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:तबब्ल 22 वर्षानंतर संजय लीला भन्साळींसोबत काम करतोय अजय देवगण, 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये साकारणार आलियाच्या मेंटॉरची भूमिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय देवगण या चित्रपटात आलियाच्या मेंटॉरच्या भूमिकेत आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात अभिनेता अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 27 फेब्रुवारीपासून तो मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट अजयसाठी खास आहे, कारण तो 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करत आहे. अजयने 22 वर्षांपूर्वी आलेल्या संजय लीला भन्साळींच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम केले होते.

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, त्यात आलियाच्या गंगूबाई काठियावाडीच्या रुपाचे कौतुक झाले. अजय देवगण या चित्रपटात आलियाच्या मेंटॉरच्या भूमिकेत आहे.

चित्रपटाचे शूटिंग रात्री सुरू होते

चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शूटिंगदरम्यान कलाकार आणि क्रू मेंबर्स यांचा जास्तीत जास्त वेळ वाचवण्यासाठी सेटवर खास पद्धती अवलंबल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त सीन्स शूट केले जात आहेत.

सूत्रांनी सांगितले, 'कलाकार आणि क्रू मेंबर्स संध्याकाळी उशीरा सेटवर येतात. रात्रभर शूट करतात आणि सकाळी घरी परत जातात. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी सेटवर ते परत येतात. अशा प्रकारे, प्रत्येकजण मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकण्यापासून वाचतोय. तसेच सेटवर रात्रीच्या अंधारात कामठीपुराचं जग कॅमेर्‍यावर टिपलं जातं.

माफिया डॉन होती गंगूबाई

शूटच्या सेटच्या डिझाईनसाठी जवळपास साडे सहा कोटी रुपये खर्च झाले आहेत. या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. गंगुबाई हे 60 च्या दशकातील मुंबई माफियातील मोठे नाव होते. तिला तिच्या पतीने केवळ पाचशे रुपयांत विकल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून ती वेश्या व्यवसायात गुंतली होती. यावेळी तिने वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींच्या कल्याणासाठी बरीच कामेही केली.

बातम्या आणखी आहेत...