आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅक टू वर्क:लग्नानंतर 24 दिवसांनी नववधू यामी गौतमने 'ए थर्सडे' आणि आदित्यने 'इम्मोर्टल अश्वत्थामा'वर सुरु केले काम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्यच्या प्रोजेक्टमध्येही आहे यामी गौतम

लग्नाच्या 24 दिवसानंतर अभिनेत्री यामी गौतमने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर काम सुरु केले आहे. यामीने 4 जून रोजी दिग्दर्शक आदित्य धरसोबत विवाहबद्ध झाली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी यामीने आपल्या चाहत्यांना दिली होती. या लग्नात दोघांच्या कुटुंबीय आणि मित्रांसह अगदी मोजके लोक उपस्थित होते.

आदित्यच्या प्रोजेक्टमध्येही आहे यामी गौतम
वृत्तानुसार, यामीने रॉनी स्क्रूवाला यांच्या आगामी ‘ए थर्सडे’ या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. मुंबईतील हे शूटिंग शेड्युल 20 दिवसांचे असेल. या दरम्यान, अॅक्शन आणि कॉन्ट्रोव्हर्शिअल सीन शूट केले जातील. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर यामी 'पिंक' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. याशिवाय रॉनी स्क्रूवाला आणि आदित्य धर यांच्या एका प्रोजेक्टमध्येही यामी काम करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षाच्या अखेरीस सुरू होईल.

आदित्यने 'इम्मोर्टल अश्वत्थामा'वरही काम सुरू केले
यामीच नव्हे तर तिचे पती आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनीही आपल्या आगामी 'इम्मोर्टल अश्वत्थामा' या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटासंदर्भात आदित्य कलाकारांशी चर्चा करत असून त्यांनी रिडींग सेशनचीही तयारी केली आहे. या चित्रपटाचा एक मोठा भाग यूक्रेनमध्ये शूट होणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'इम्मोर्टल अश्वत्थामा'चे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...