आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोशल मीडिया:50 मिलियन फॉलोवर्स झाल्यानंतर श्रद्धा कपूरने तीन भाषांमध्ये मानले चाहत्यांचे आभार, दीपिकाला मागे टाकत बनली दुसरी सर्वात जास्त फॉलोवर्स असणारी अभिनेत्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा कपूरने तिच्या उत्कृष्ट फॅन फॉलोव्हिंगमुळे इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्सचा आकडा ओलांडला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोजकेच लोक आहेत ज्यांनी हा पराक्रम गाजवला आहे. जनतेच्या आवडत्या अभिनेत्रीने पडद्यावर उत्तम अभिनय तर दिला आहे, पण तिने ऑफस्क्रीनही चाहत्यांची मने जिंकली आहेत. या खास प्रसंगी तिच्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी अभिनेत्रीने मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हस्तलिखित नोट्स शेअर केल्या आहेत!

श्रद्धाने तिचा आनंद व्यक्त करताना इंस्टाग्रामवर लिहिले की, "माझ्या सर्व प्रिय, बाबूडी, फॅन क्लब आणि हितचिंतक. तुम्ही प्रेमाणे बनवलेले मी सर्व व्हिडिओ, एडिट आणि पोस्ट मी पाहिल्या आहेत. हे पाहून माझे मन भरुन आले. मी तुमच्या सर्वांमुळे येथे आहे. मी तुम्हाला सुख आणि शांतीसोबतच खूप-खूप शुभेच्छा देते. कृपया स्वतःची चांगली काळजी घ्या, दयाळू राहा आणि चमकत रहा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद 50 लाख वेळा.

View this post on Instagram

🙏🦋🦄 🌻💫💜

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on Jul 15, 2020 at 8:11pm PDT

 सोशल मीडियावरून पसरवते सामाजिक विषयांविषयी जागरूकता

श्रद्धा सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने #LockdownZoos ही मोहिम सुरू केली आहे. ज्यामध्ये ती सतत झू बंद करण्याची मागणी करत आहे. प्राण्यांप्रती नेहमी दयाळु असणारी ही अभिनेत्री सतत प्राण्यांवरील अत्याचारावर प्रकाश टाकत राहते आणि तिच्या चाहत्यांना वेळोवेळी आग्रह करते की ती प्राणी वाचविण्यासाठी शक्य तितकी मदत करा. पर्यावरणीय कार्यकर्ते असल्याने ती, आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरा, लाकडी दात घासण्याचा ब्रश निवडण्याचा सल्ला देत असते. श्रद्धा स्वत: देखील इको फ्रेंडली वस्तू वापरते.

श्रद्धाच्या पोस्ट अतिशय सौहाद्र्रपूर्ण असतात. कारण त्यात फॅशन ते बीटीएस, चित्रपट, अॅनिमल कडल, पर्यावरणाविषयीच्या अपडेट्स आणि जगभरात घडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेणे या सर्वांचा समावेश असतो. श्रद्धा एक व्यक्ती म्हणून किती जागरूक आणि संवेदनशील आहे हे देखील यातून दिसून येते. श्रद्धा कपूर लवकरच लव्ह रंजनच्या पुढच्या चित्रपटात रणबीर कपूर सोबत दिसणार आहे.

View this post on Instagram

🙏🦋🦄 🌻💫💜

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor) on Jul 15, 2020 at 8:42pm PDT