आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंगचा श्रीगणेशा:रोज 86 किलोमीटर अप-डाऊन करत ‘शेरनी’चे शूटिंग करतेय विद्या बालन, रस्तामार्गे गोंदिया ते बालाघाट करतेय प्रवास

अमित कर्ण, मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्याच्या या चित्रपटात अॅक्शन आहे मात्र गाणे एकही नाही.

अभिनेत्री विद्या बालनने बुधवारपासून मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये आपल्या आगामी 'शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी विद्या क्रूसह सेटवर पूजा करताना दिसली. यावेळी संपूर्ण टीम पीपीई कीटमध्ये होती. सेटवर उपस्थित सूत्रानी संागितले, विद्या चित्रपटात फॉरेस्ट रेंजरच्या भूमिकेत आहे. ती बालाघाटपासून 43 किलोमीटर दूर गोंदिंयामध्ये राहते, तेथे ती शूटिंगच्या एक आठवडा आधी पोहोचली होती. गोंदिया महाराष्ट्राच्या सीमेशी लागलेला भाग आहे. त्यामुळे विद्या रोज 86 किलोमीटर अपडाऊन करुन शूटिंग करत आहे.

  • हेलिकाॅप्टरची मागणी केली नाही

चित्रपटाची कथा विद्याच्या पात्रावर आधारित आहे. निर्मात्यांनी विद्यावर पैसा लावला आहे. त्यामुळे विद्याने बजेटचा विचार करत प्रॉडक्शनवर अतिरिक्त बोजा टाकला नाही. तिने हॉटेलपासून ते सेटपर्यंत जाण्यासाठी एखाद्या हेलिकॉप्टरची मागणी केली नाही. ती बाय रोडने गोंदिया ते बालाघाट अपडाऊन करत आहे.

  • रेंजर्स विद्यापीठात शूटिंग सुरू

लॉकडाऊनच्या आधी चित्रपटाचे शूटिंग भूतपलासी गावात 13 दिवसांपर्यंत आदीवासीमध्ये करण्यात आले होते. आता बालाघाटात याचे 30 दिवसाचे शेड्यूल आहे. बालाघाटातील रेंजर्स विद्यापीठाच्या लंगूर फॉरेस्टमध्ये याचे शूटिंग होत आहे. निर्मात्यांना वनविभागाकडुन गार्डदेखील मिळाले आहेत. याशिवाय राज्य सरकारने 50 पेक्षा जास्त पोलिसांना विद्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवले आहे. बालाघाटातील जंगलात मुंबईवरुन 150 लोकांचे क्रूमेंबर्स आले आहेत.

  • विजय राजसोबत ‘डेढ इश्किया’मध्ये केले आहे काम

चित्रपटात विद्या व्यतिरिक्त विजय राजदेखील प्रमुख भूमिकेत आहे. दोघांनी आधी ‘डेढ इश्किया’मध्ये सोबत काम केले आहे. विद्याप्रमाणेच यात विजयदेखील फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. खरं तर, हा चित्रपट जंगलात वन अधिकाऱ्यांच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन ‘न्यूटन’ फेम डायरेक्टर अमित मसुरकर आहेत. यात अॅक्शन आहे मात्र गाणे एकही नाही.

  • मध्यप्रदेशात मिळतेय पाच कोटींचे अनुदान

निर्मात्यांना सध्या मध्यप्रदेशमध्ये सर्वात जास्त सबसिडी मिळत आहे. या सबसिडीची मर्यादा पाच कोटीपर्यंत आहे. इतर ठिकाणी 2 कोटी रुपये आहे.