आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये कोरोना:अक्षय कुमारनंतर 57 वर्षीय गोविंदा कोव्हिड पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी पत्नीला झाला होता कोरोना

बॉलिवूडमध्ये कोरोनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातील स्टाफसह सर्व निगेटिव्ह

सुपरस्टार अक्षय कुमारनंतर हिरो नं. 1 नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता गोविंदाला कोरोनाची लागण झाली आहे. 57 वर्षीय गोविंदाने वृत्त संस्थेला याबाबत माहिती दिली. गोविंदा म्हणाला की, "चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. सध्या मी सर्व निर्बंधांचे पालन करत आहे."

घरातील स्टाफसह सर्व निगेटिव्ह

गोविंदाने आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे सांगितले की, "कुटुंबातील इतर व्यक्ती आणि स्टाफची रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वीच सुनीता (पत्नी) कोरोनातून बरी झाली होती. सध्या मी होम क्वारंटाइन आहे. सर्वांनी आवश्यक काळझी घेण्याचे मी आवाहन करतो."

अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांने घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्याने स्वतः याविषयी माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहिले की, 'तुम्हा सर्वांना माहिती द्यायची आहे की, आज सकाळी माझा कोविड -19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मी गरातच क्वारंटाइन आहे आणि आवश्यक त्या औषधी घेत आहे. मी सर्वांना अवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी. मी लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल.'

बातम्या आणखी आहेत...