आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग:माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरवर यशराजने टाकला विश्वास, अक्षय कुमारनंतर आता विकी कौशलच्या पहिल्या विनाेदी चित्रपटात झळकणार

अमित कर्ण. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयसोबत 'पृथ्वीराज' मधून बॉलिवूडमध्ये करणार आहे पर्दापण

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा पहिला चित्रपट पृथ्वीराज चौहानची शूटिंग मागच्या वर्षी 18 नोव्हेंबरला सुरू झाली होती. आता 18 ऑगस्ट राेजी तिने दुसरा चित्रपट विकी कौशलसाेबत साइन केला आहे. ती लवकरच विकीसोबत याची तयारी सुरु करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करणार आहे. हा विकीच्या करिअरमधला पहिला विनोदी चित्रपट आहे.

  • ऑडिशननंतर मिळाला रोल

याबद्दलची माहिती देताना ट्रेंड विशेषज्ञ म्हणाले, मानुषी आउटसाइडर आहे. यशराजने तिच्यावर विश्वास दाखवला आहे. ते त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांसाठी तिला घेत आहेत. या चित्रपटात विकीसोबत ती पहिल्यांदा दिसणार आहे. या चित्रपटासाठीदेखील तिने ऑडिशन दिले आहे. हा चित्रपट यशराजच्या ‘प्रोजेक्ट 50’ चा एक भाग आहे. याची घोषणा ही 27 सप्टेंबरला आदित्य चोप्रा स्वतः करणार आहेत. वैयक्तिक पातळीवर त्यांना चित्रपटांकडून खास अपेक्षा आहेत.

  • ऑक्टोबरमध्ये शूट करणार युद्धाचे दृश्य

‘पृथ्वीराज’ शी संबधित लोकांनी सांगितले, या चित्रपटाचा 60 ते 64 टक्के भाग शूट झाला आहे. बाकी पोर्शनसाठी अक्षय कुमारने ऑक्टोबरच्या तारखा दिल्या आहेत. हा चित्रपट युद्धावर अाधारित आहे. यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मानुषी यामध्ये बॉडी डबलचा वापर करणार नाही तर स्वतः अॅक्शन दृश्य करणार आहे. ऑक्टोबरमध्ये वॉर सिक्वेन्सेसचे क्लोज शॉट शूट करणार आहेत. यशराज स्टुडिओत याचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. याआधी युद्धाचे मोठे दृश्य दहिसरच्या मैदानात चित्रित केले.

मानुषी आणि 18 तारखेचा अजब योग

  • 18 नाेव्हेंबर 2017 रोजी मिळाला मिस वर्ल्ड ताज.
  • 18 नोव्हेंबर 2019 रोजी सुरू केला पहिला चित्रपट.
  • 18 ऑगस्ट 2020 रोजी साइन केला दुसरा बॉलिवूड चित्रपट.
बातम्या आणखी आहेत...