आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बच्चन कुटुंबात कोरोना:अमिताभ आणि अभिषेकनंतर ऐश्वर्या-आराध्या नानावटी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेकनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्यालाही मुंबईतील नानावटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघींमध्ये हलके लक्षणे आढळल्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री अंदाजे 8.30 वाजता हॉस्पीटलच्या अँम्बुलंसमधून दोघी रुग्णालयात गेल्या. 

रविवारी ऐश्वर्याची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती

शनिवार (11 जुलै) अमिताभ आणि अभिषेक यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. यानंतर कुटुंबातील सदस्य आणि घरातील स्टाफच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यामध्ये कोरोनाचे हलके लक्षणे आढळली होती. यानंतर कोव्हिड-19 च्या क्वारेंटाइन नियमांनुसार, त्यांना घरात क्वारेंटाइन करण्यात आले होते. आता सहा दिवसानंतर ऐश्चर्या-आराध्याला ताप आल्यानंतर हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
0