आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'आर्टिकल 15' या गाजलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि अभिनेता आयुष्मान खुराना ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर परतत आहे. 'अनेक' हे या जोडीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आयुष्मानने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. यापैकी एका फोटोत आयुष्मान अनुभव सिन्हांसोबत दिसतोय, तर दुस-या फोटोत आयुष्मान जीपमध्ये बसलेला दिसतोय.
हे फोटो शेअर करत आयुष्मानने सोशल मीडियावर लिहिले, "पुन्हा एकदा अनुभव सिन्हांसोबत काम करण्यास मी उत्साही आहे. जोशूच्या भूमिकेतील माझा हा पहिला लूक," असे तो म्हणाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 'अनेक' हा आगामी चित्रपट अनुभव सिन्हांचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असेल.
Excited to be collaborating with Anubhav Sinha sir. Again. #ANEK.😃🙏🏼
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) February 2, 2021
Here's presenting my look as Joshua produced by @anubhavsinha and #BhushanKumar @BenarasM @TSeries pic.twitter.com/PbhZc2hyxh
आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे, त्याचे 'चंडीगढ करे आशिकी' आणि 'डॉक्टर जी' हे दोन चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. ‘चंदीगढ करे आशिकी’मध्ये आयुष्मानसह वाणी कपूर झळकणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तर 'डॉक्टर जी' या चित्रपटात त्याच्यासह रकुल प्रीत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.