आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK बॅक टू वर्क:शूटिंगवर पतरण्यापूर्वी शाहरुखने दिग्दर्शकाकडे ठेवली अट - आउटडोअर शेड्युल छोटे ठेवावे, कुटुंबाला भेटण्यासाठी दर आठवड्याला मुंबईला येणार

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून शाहरुख खान त्याच्या कुटुंबासाठी अतिशय प्रोटेक्टिवर झाला आहे.

मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या आगामी सर्व चित्रपटांचे शूटिंग थांबवले होते. आता शाहरुख पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र, यासाठी त्याने दिग्दर्शकासमोर एक विशेष अट ठेवली आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानने परदेशात शूट होणाऱ्या त्याच्या चित्रपटांचे शेड्यूल कमी दिवसांचे ठेवण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन तो अधूनमधून मुंबईला त्याच्या कुटुंबीयांना भेटू शकेल.

कुटुंबाला प्राधान्य
शाहरुखने दिग्दर्शकाला त्याचे वेळापत्रक असे सेट करण्याची विनंती केली आहे की, तो दर आठवड्याला मुंबईला येऊ शकेल आणि यादरम्यान, इतर कलाकारांचे त्यांच्या भागाचे शूटिंग सुरु राहील. यामुळे शाहरुखला त्याच्या कुटुंबीयांनाही भेटता येईल आणि शूटिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

रिपोर्टनुसार, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून शाहरुख खान त्याच्या कुटुंबासाठी अतिशय प्रोटेक्टिवर झाला आहे. परंतु आता यासोबतच शाहरुखला त्याच्या व्यावसायिक जीवन आणि कुटुंबामध्ये संतुलन राखायचे आहे.

आर्यन खानचा बॉडीगार्ड आहे शाहरुखचा अतिशय विश्वासू व्यक्ती
आर्यन खानला जामीन मिळाल्यापासून शाहरुख खान त्याच्यासाठी बॉडीगार्ड शोधत होता, मात्र आता शाहरुखने त्याच्या सुरक्षेसाठी आपला जुना बॉडीगार्ड रवी सिंगची नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवी हा शाहरुखचा सुरक्षा प्रमुख होता. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर रवी सिंग त्याला नेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता.

आर्यन ड्रग्ज प्रकरणापूर्वी शाहरुख 'पठाण' चित्रपटासाठी परदेशात शूटिंग करत होता. आता या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. याशिवाय शाहरुख टायगर 3 मध्ये कॅमिओ आणि एटलीच्या अनटाइटल्ड चित्रपटासाठी शूटिंग करणार आहे.

वडिलांशी बोलण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते
2 ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की, वडील शाहरुख खान यांच्याशी बोलण्यासाठी त्याला वडिलांची मॅनेजर पूजा ददलानी
हिच्याकडे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. थेट वडिलांशी बोलणे त्याला शक्य नसते. आर्यनच्या या खुलाशाने एनसीबीचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले होते.

बातम्या आणखी आहेत...