आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लुझिव्ह:आर्यननंतर आता NCB च्या निशाण्यावर करण जोहर, दोन वर्षे जुन्या पार्टी व्हिडिओ प्रकरणाचा तपास अद्याप बंद झालेला नाही

अमित कर्ण/अजीत रेडेकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यन प्रकरण प्रतिष्ठेचा मुद्दा, सेलेब्सची परेड पुन्हा होणार

आर्यन खाननंतर चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हा NCB च्या निशाण्यावर आहे. एक वर्षापूर्वी व्हायरल झालेल्या करणच्या पार्टीच्या व्हिडिओबाबत एनसीबीचा तपास अद्याप थांबलेला नाही. दरम्यान, केंद्र सरकारने मुंबई NCB चे रिजनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या 6 महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर असू शकतात. NCB शी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर भास्करला सांगितले की, करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ अद्याप तपासात आहे. यात रणबीर कपूर, विकी कौशल, वरुण धवन, मलायका अरोरा, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, दिग्दर्शक अयान मुखर्जी दिसत आहेत. व्हिडिओ 28 जुलै 2019 चा असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडिओ स्वतः करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर सेलेब्स या पार्टीत ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, खुद्द करण जोहरनेही म्हटले की, पार्टीमध्ये कोणीही ड्रग्ज घेतले नव्हते. पहिल्या तपासात व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज अँगलवर तपास सुरू झाला तेव्हा हा तपास करण्यात आला.

वानखेडे यांच्या निशाण्यावर बॉलिवूड

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, समीर वानखेडे त्यांच्या 6 महिन्यांच्या एक्सटेंशनमध्ये बॉलिवूडचा पिच्छा सोडणार नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरण अजूनही सुरू आहे. याशिवाय करण जोहरच्या पार्टीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. करण जोहरने सांगितले होते की, त्या पार्टीत कोणीही ड्रग्ज घेतले नव्हते, पण त्या पार्टीत सहभागी असलेले सेलेब्स अजूनही एनसीबीच्या रडारवर आहेत.

रिया, अरमान आणि आर्यन ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे जुळलेले

एनसीबीच्या तपासात असे आढळून आले आहे की, रिया आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरण, अरमान कोहली ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन ड्रग्ज प्रकरणाचा धागेदोगे एकमेकांशी जुळलेले आहेत. पॅडलर नेटवर्कपासून ते ड्रग्ज घेणाऱ्यांपर्यंत लोक एकमेकांना ओळखतात आणि एकत्र ड्रग्ज घेतात किंवा वितरीत करतात.

आर्यन प्रकरण प्रतिष्ठेचा मुद्दा, सेलेब्सची परेड पुन्हा होणार
आर्यन प्रकरण एनसीबीसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. एनसीबीवर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत की, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय शाहरुखच्या मुलाला त्रास दिला जात आहे. याआधीही दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानच्या बाबतीत एनसीबीवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अशा परिस्थितीत एनसीबी अधिकारी प्रकरण योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करत आहेत. हे शक्य आहे की लवकरच NCB कार्यालयात अनेक सेलेब्सची दुसरी परेड आयोजित केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...