आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांचे प्रेम:अपारशक्ती खुराणाने शेअर केला चिमुकलीसोबतचा सुंदर फोटो, कॅप्शनमध्ये लिहिले...

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 ऑगस्ट रोजी झाला आरजोयीचा जन्म

अभिनेता अपारशक्ती खुराणाची पत्नी आकृती आहुजा खुराणाने यावर्षी ऑगस्टमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव आरजोयी ए खुराणा असे ठेवले. आता सोमवारी म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी अपारशक्तीने त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सेलेब्सने फोटोवर प्रतिक्रिया दिल्या

अपारशक्तीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "मेरी अर्जिया...." फोटोमध्ये अपारशक्तीने त्याच्या लाडक्या लेकीला जवळ घेतलेले दिसत आहे. या फोटवर अपारशक्तीचा भाऊ आणि अभिनेता आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर, रिद्धिमा पंडित, मुक्ती मोहन आणि वरुण शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आणि आरजोयी खूप प्रेम दिले आहे.

27 ऑगस्ट रोजी झाला आरजोयीचा जन्म
अपारशक्तीने 27 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरजोयीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांसोहत शेअर केली होती. सोबतच त्याने आपल्या पोस्टमध्ये एका छोट्या हत्तीचा फोटो असलेले कार्ड शेअर केले होते.. या कार्डवर 27 ऑगस्ट 2021 ही तारीख होती. 27 ऑगस्टला आरजोयीचा जन्म झाला. अपारशक्तीने 4 जून रोजी पत्नीच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना सांगितले होते. 7 सप्टेंबर 2014 रोजी अपारशक्ती आणि आकृती विवाहबद्ध झाले होते.

अपारशक्ती 'हेल्मेट'मध्ये दिसणार आहे
अपशक्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे त्याचा "हेल्मेट" हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या क्वर्की कॉमेडी चित्रपटात तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपटात सामाजिक संदेश देतो. मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतनही या चित्रपटात त्याच्यासोबत दिसणार आहे.

अपारशक्तीने 'दंगल' चित्रपटातून केले होते पदार्पण
अपारशक्तीने आपली कारकीर्द रेडिओ जॉकी म्हणून सुरू केली. चंदीगडमध्ये जन्मलेला अपारशक्ती 'एमटीव्ही रोडीज'मध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला होता. त्याने या शोसाठी ऑडिशन दिली होती. 2016 मध्ये त्याने 'दंगल' चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने 'स्ट्रीट डान्सर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'स्त्री', 'लुका छुपी', 'पती पत्नी और वो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

बातम्या आणखी आहेत...