आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खास बातचित:'बादशाहो' आणि 'रेड' नंतर तिस-यांदा अजय देवगणसोबत जमणार इलियाना डिक्रूजची जोडी, म्हणाली...

अमित कर्ण21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजयसोबतचा इलियानाचा आगामी चित्रपट थ्रिलर किंवा हॉरर असू शकतो.

अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज तिस-यांदा ऑनस्क्रीन जोडी म्हणून एकत्र येणार आहेत. स्वत: इलियाना डिक्रूझने दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात याची पुष्टी केली. ती म्हणाली, "मी याबद्दल अधिकृतपणे सांगू शकत नाही, पण हो अजयसोबत काही चित्रपटांवर बोलणी सुरु आहेत. प्रेक्षकांना आमची ऑनस्क्रीन जोडी लवकरच पाहायला मिळेल. आमचा आगामी चित्रपट थ्रिलर किंवा हॉरर असू शकतो, पण योग्य वेळ आल्यावरच त्याविषयी मी अधिक काहू सांगू शकेल. मी नशीबवान आहे की, माझ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली."

'द बिग बुल'मध्ये को-स्टार अभिषेक बच्चन अतिशय चिल्ड आउट होता
इलियाना डिक्रूज सांगते, 'द बिग बुल'मधील को-स्टार अभिषेक बच्चन खूप चिल्ड आउट होता. सेटवर त्याने खूप मजा केली आहे. पण कधी त्याला प्रँक करताना पाहिले नाही. तर अजय देवगण यालउट खूप प्रँक करतो. पण सुदैवाने अजयने माझी कधी खोडी काढली नाही. दोघेही खूप मोठे स्टार आहेत, पण दोघांमध्ये काहीच टँट्रम नाहीत."

मला वेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत
इलियाना पुढे म्हणाली, "बर्फी 'पासून ते ' रेड 'आणि' द बिग बुल 'पर्यंत अंतराने अतिशय निवडक चित्रपट केले आहेत. खरं तर मी बर्‍याच ऑफर होल्डवर ठेवल्या होत्या. मला वेगळ्या भूमिका करायच्या आहेत. माझ्या चुझी स्वभावामुळे मला मला उत्तम ऑफर येत आहेत. मला दक्षिणेचे चित्रपट हातून जाऊ द्यायचे नाहीत. हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये बॅलेन्स राखायचे आहे. मी सध्या मुंबईतच आहे."

यावर्षीपासून खूप काम करणार असल्याचे स्वतःला वचन दिले आहे
पुढे इलियाने म्हणते, "आतापर्यंत दर दोन वर्षांच्या अंतराने माझा एक चित्रपट यायचा. यावेळी महामारीमुळे याला आणखीनच उशीर झाला आहे. पण आता मी या वर्षीपासून भरपूर काम करण्याचे स्वतःला वचन दिले आहे. अनावधानाने मी बराच वेळ व्यर्थ घालवला आहे. पण याचा अर्थ मी एकाच वेळी डझनभर चित्रपट साइन करेल, असा नाही. लॉकडाउन दरम्यान मी कोणतेही नवीन कार्यक्रम किंवा चित्रपट पाहिले नाहीत. याकाळात घर सजवले आणि ब्रेड बनवायला शिकले."

फिक्शनल पात्र सुंदरपणे मांडायचे आहे
इलियाना डिक्रूज सांगते, "ट्रेड एक्सपर्ट्सच्या मते, मी स्क्रीनवर पात्र रॉयल बनवते. म्हणून मी ऐतिहासिक पात्र किंवा बायोपिक केले पाहिजे. तथापि, मला वाटते की वास्तविक जीवनापेक्षा रिल लाइफ पात्र मी जास्त चांगले वठवू शकते. मला गॉन गर्लमधील अभिनेत्री रोजामंड पाइक हिने जे पात्र साकारले होते, तशा भूमिका मला करायच्या आहेत. मी तसे पात्र सक्षमपणे साकरु शकते."

बातम्या आणखी आहेत...