आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर:कोव्हिड व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतरही परेश रावल कोरोना संक्रमित, स्वतः पोस्ट करत दिली माहिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेऊनही संक्रमित होणारे दुसरे सेलिब्रिटी

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता नुकतेच बॉलिवूडचे बाबू भैय्या म्हणजेच परेश रावल कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. याविषयीची माहिती स्वतः परेश रावल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. यासोबतच त्यांनी आवाहन केले आहे की, गेल्या 10 दिवसांमध्ये जे लोक त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.

परेश रावल यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, 'दुर्दैवाने माझी कोविड-19 टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जे कुणी माझ्या संपर्कात आहे आहेत, त्या सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.' लस घेतल्यानंतरही परेश रावल कोरोना संक्रमित झाले आहेत. त्यांनी 9 मार्चला कोविड-19 लसीचा पहिला डोज घेतला होता.

लस घेऊनही संक्रमित होणारे दुसरे सेलिब्रिटी
65 वर्षांचे परेश रावल यांनी व्हॅक्सीन घेतल्यानंतर सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करत लिहिले होते की, 'V फॉर व्हॅक्सीन, सर्व डॉक्टर्स, नर्स, फ्रंट लाइन हेल्थ केअर वर्कर्स, वैज्ञानिक आमि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप धन्यवाद' लस घेतल्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आढळणारे परेश दुसरे बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत. त्यांच्यापहिले याच आठवड्यात फिल्ममेकर रमेश तौरानी पॉजिटिव्ह आढळले होते. त्यांनीही कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला होता.

या सेलेब्सनेही घेतला आहे कोव्हिड व्हॅक्सीनचा पहिला डोज
गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड सेलेब्सने कोरोना व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला आहे. यानंतर सर्वांनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत लोकांना व्हॅक्सीन घेण्यासाठी जागरुक केले होते. परेश रावल यांच्यापूर्वी संजय दत्त, सैफ अली खान, राकेश रोशन, सतीश शाह, शिल्पा शिरोडकर, जॉनी लीवर, मेघना नायडू, शर्मिला टागोर, नीना गुप्ता, धर्मेद्र, कमल हासन, हेमा मालिनी, अनुपम खेर, गजराज राव, नागार्जुनसह अनेक सेलेब्सने कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...