आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:'बेलबॉटम' नंतर आता 'मिशन सिंड्रेला'साठी पुन्हा एकदा इंग्लंडला पोहोचला अक्षय कुमार, 20 ऑगस्टनंतर सुरु होईल चित्रपटाचे चित्रीकरण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंगच्या आधी अक्षय सहा दिवस तिथे क्वारंटाइन असेल.

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' हा चित्रपट येत्या आठवड्यात रिलीज होत आहे. दुसरीकडे आपल्या आगामी 'मिशन सिंड्रेला' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अक्षय इंग्लंडला पोहोचला आहे. दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक रणजित तिवारी हे आहेत. त्यांच्या टीमने सांगितले की, अक्षय एकामध्ये रॉ एजंट आहे तर दुसऱ्यामध्ये तो मनाली पोलीस स्टेशनचा प्रभारी आहे.

'मिशन सिंड्रेला'चे शूटिंग 25 ऑगस्टपासून सुरू होईल, परंतु अक्षय आधीच इंग्लंडला पोहचला आहे कारण शूटिंगच्या आधी तो सहा दिवस तिथे क्वारंटाइन असेल. अक्षय इंग्लंडमध्येच 'बेलबॉटम'चे विशेष स्क्रिनिंगही ठेवणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्टपासून तो 'मिशन सिंड्रेला'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होईल. अक्षयच्या आधी दिग्दर्शक त्याच्या टीमसह तिथे पोहोचले होते. प्रॉडक्शन डिझायनर्सचे युनिट या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून इंग्लंडमधील स्थळांची रेकी करत आहेत.

अशाप्रकारे वेळेआधीच 'बेलबॉटमचे शेड्यूल पूर्ण झाले होते
चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर परवेज शेख म्हणाले, ''बेलबॉटम' हा भारतातील पहिला असा चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण तेव्हा झाले जेव्हा संपूर्ण जग अनलॉक होते. सुमारे 150 लोकांचे युनिट भारतातून ग्लासगोला गेले होते. तेव्हा प्रत्येकला 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. अशा परिस्थितीत अक्षय कुमारने क्रू मेंबर्सना आवाहन केले होते की, 150 लोकांच्या युनिटला 14 दिवस काम न करता परदेशात ठेवल्याने बजेट आणि त्यांच्या स्पिरिटवर परिणाम होईल. अक्षयच्या अपीलमुळे क्रू मेंबर्सवर इतका प्रभाव पडला की, त्यांनी हॉटेलमध्येच अ‍ॅक्शन आणि इतर सर्व सीन्स कसे, कुठे चित्रीत करायचे हे सर्व डिझाइन केले होते. जेव्हा क्वारंटाईन काळ संपला तेव्हा एकाच दिवशी वेगवेगळ्या लोकेशनवर तीन-तीन सीन चित्रीत करुन चित्रीकरण पूर्ण केले गेले. त्या वेगवेगळया लोकेशनवर कुठे अ‍ॅक्शन सीक्वेन्स, तर कुठे गाणी आणि काही टॉकी सीन्स चित्रीत केले गेले. अशा प्रकारे संपूर्ण चित्रपट शेड्यूलच्या आधी पूर्ण झाला.'

'बेलबॉटम'चा क्लायमॅक्स आहे खास

परवेज शेख पुढे म्हणाले, "हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 1984 मधील विमान हायजॅक प्रकरणावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. हायजॅक केलेले विमान तसेच त्यातील प्रवाशांना सुखरुप वाचवण्याचे आव्हान भारत सरकारपुढे आहे. त्यामुळे सरकार एका कर्तव्यदक्ष आणि चाणाक्ष अशा माणसाच्या शोधात आहे. त्यानंतर ही जबाबदारी बेल बॉटम नावाचा कोड असेल्या रॉ अधिकाऱ्यावर सोपवलेली आहे. याच रॉ अधिकाऱ्याची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे. क्लायमॅक्समध्ये अक्षय कुमारच्या चाहत्यांना पसंत पडेल असे अ‍ॅक्शन सीन डिझाइन केले गेले आहेत. एकूण क्लायमॅक्स 12 ते 15 मिनिटांचा आहे. हा सीन अक्षय कुमारने ग्लासगो विमानतळाच्या रनवे वर चित्रीत केला आहे. ज्यामध्ये विमान अपहरणाचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते. रनवेवर हे दृश्य दोन विमाने आणि अनेक वाहनांच्या मदतीने चित्रीत करण्यात आले. हे चित्रीकरण संस्मरणीय आहे. कारण आम्हाला भारताबाहेर भारत, दुबई, अबू धाबी, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे अड्डे दाखवायचे होते.'

अक्षय सप्टेंबरपर्यंत इंग्लंडमध्ये 'मिशन सिंड्रेला'चे चित्रीकरण करणार
बेलबॉटममध्ये हुमा कुरैशीची महत्त्वाची भूमिका आहे. वाणी कपूरपेक्षा तिचे जास्त सीन्स आहेत. याबाबत परवेज म्हणाले, "हुमाचा अ‍ॅक्शन अवतार तिच्या चाहत्यांसाठी हैराण करणारा असेल. तिने तसेचअ‍ॅक्शन आणि स्टंट केले आहेत, जसे 'बेबी'मध्ये तापसी पन्नूने केले होते.' अक्षय कुमार सप्टेंबरपर्यंत इंग्लंडमध्ये 'मिशन सिंड्रेला'चे शूटिंग करणार आहे. तिथून भारतात परतल्यावर तो 'राम सेतू' आणि 'रक्षाबंधन' हे प्रोजेक्ट पूर्ण करेल.

बातम्या आणखी आहेत...