आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:'आशिकी' फेम राहुल रॉयला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, सोशल मीडियावर कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे मानले आभार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल मागील दीड महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होता.

अभिनेता राहुल रॉय याला मीरा रोडस्थित व्होकहार्ट हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो आता आपल्या घरी परतला आहे. याबाबतची माहिती स्वत: राहुलने गुरुवारी काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन दिली आहे. फोटोमध्ये राहुल आपली बहीण प्रियांका आणि मेहुणे रोमिर सेनसोबत दिसत आहे. त्याचा भाऊ रोहित रॉयदेखील एका फोटोमध्ये दिसत आहे. दीड महिन्यांपूर्वी राहुलला ब्रेन स्ट्रोक आला होता.

राहुलने फोटो शेअर करुन लिहिले, "रुग्णालयात बराच काळ उपचार घेतल्यानंतर मी घरी परतलो आहे. मी बरा होतोय. मात्र पूर्णपणे बरा होण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. याकाळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणा-यांचे मी आभार मानू इच्छितो. माझा भाऊ रोहित, माझी बहीण आणि सर्वात चांगली मैत्रीण प्रियांका, माझे मेहुणे रोमिर, माझी मैत्रीण आदिती गोवित्रीकर, डॉ. हुज, जाहिद, अश्विनी कुमार, अजहर, श्रुती द्विवेदी, सुचित्रा पिल्लई आणि माझे सर्व चाहते ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तुम्हा सर्वांना माझे प्रेम," अशा शब्दांत राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

घरी राहुलची फिजिओ आणि स्पीच थेरपी सुरू राहणार
राहुलचे मेहुणे रोमिर सेन यांनी सांगितले की, 'घरी परत आल्यामुळे राहुलला फार आनंद झाला आहे. आता घरी त्याची फिजिओ आणि स्पीच थेरपी सुरु राहणार आहे. त्याला पूर्ण बरे व्हायला थोडा वेळ लागणार आहे. सहा ते सात महिन्यांत तो पूर्ण बरा होईल अशी आशा आहे.' व्होकहार्ट हॉस्पिटलच्या आधी राहुलला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून च्याला 8 डिसेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला होता.

कारगिलमध्ये शूटिंगदरम्यान आला होता ब्रेन स्ट्रोक
52 वर्षीय राहुल रॉयच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. कारगिलमध्ये LAC : Live the Battle चित्रपटाचे शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यावेळी त्याला श्रीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. 28-29 नोव्हेंबर दरम्यान, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहुलची प्रकृती गंभीर झाल्याने सुरुवातीला त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. राहुल रॉयला प्रोगेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉयला मेंदूघाताचा झटका आल्याचा अंदाज वर्तवला गेला होता.

राहुलच्या आगामी LAC या चित्रपटाविषयी सांगायचे म्हणजे हा चित्रपट लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत आणि चीन या दोन देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर आधारित आहे. नितीन कुमार गुप्ता याचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रा वकील शर्मा आणि निवेदिता बासू यांची ही निर्मिती आहे. या चित्रपटात बिग बॉस 14 चा स्पर्धक निशांत मलकानी मुख्य भूमिकेत आहे.

'आशिकी'द्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण
मागील तीन दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या राहुलने 1990 च्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, या चित्रपटात अनु अग्रवालदेखील मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर राहुल 'जुनून' (1992), 'फिर तेरी कहानी याद आइ' (1993), 'नसीब' (1997), 'एलान' (2011) आणि 'कॅबरे' (2019) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचा (2007) विजेताही होता.

बातम्या आणखी आहेत...