आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी रिमेक चित्रपट:'कुली नंबर 1'नंतर 'जर्सी'पासून ते 'द इंटर्न' पर्यंत, हे आहेत बॉलिवूडचे आगामी रिमेक आणि सिक्वेल चित्रपट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूडमध्ये ब-याच चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वेल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

सारा अली खान आणि वरुण धवनचा ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कुली नंबर 1' चा हा रिमेक असून ज्यामध्ये करिश्मा कपूर आणि गोविंदाने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट 90 च्या दशकात खूप गाजला होता. मात्र वरुण आणि साराच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता कुली नंबर 1 नंतर बॉलिवूडमध्ये आणखी ब-याच चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वेल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. कोणते आहेत हे चित्रपट त्यावर टाकुयात एक नजर...

लाल सिंह चड्ढा

आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंपचा या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 105 कोटींच्या बजेटमध्ये होत असलेला हा चित्रपट आता नवीन वर्षात म्हणजेच यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

जर्सी

'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक 'कबीर सिंह'नंतर आता दक्षिणेतील आणखी एका गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक हिंदीत येतोय. जर्सी हे या चित्रपटाचे नाव असून बर्‍याच दिवसांनी कमबॅक करणार्‍या एका क्रिकेटरची ही कहाणी आहे. मूळ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता हरीश कल्याणने मुख्य भूमिका साकारली होती, तर जर्सीच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता शाहिद कपूर लीड रोलमध्ये झळकणार आहे.

रॅम्बो

सिद्धार्थ आनंदच्या ‘वॉर’नंतर टायगर श्रॉफ लवकरच त्यांच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या रॅम्बो या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 1982 सालच्या सिल्वेस्टर स्टेलॉनच्या रॅम्बोचा हिंदी रिमेक आहे.

द इंटर्न

दीपिका पदुकोण हॉलिवूड फिल्म 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता ऋषी कपूर दिसणार होते. मात्र त्यांच्या निधनानंतर आता कास्टमध्ये बदल करण्यात आला आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

द गर्ल ऑन द ट्रेन

परिणीती चोप्रा लवकरच बेस्ट सेलर बुक ‘द गर्ल ऑन द ट्रेन’वर आधारित हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहेत, ज्यात अभिनेत्रीचा इंटेन्स लूक दिसत आहे.

भूल भुलैय्या 2

2007 साली रिलीज झालेल्या भूल भुलैय्या या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता कार्तिक आर्यन या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. भूल भुलैय्या 2 मध्ये कार्तिकसह किआरा आडवाणी दिसणार आहे. 31 जुलै 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मागील वर्षी मार्चमध्ये चित्रीकरणदेखील सुरु होते. मात्र कोरोनामुळे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. हा चित्रपट अनीस बज्मी दिग्दर्शित करत आहेत.

दोस्ताना 2

2008 मध्ये आलेल्या दोस्ताना या चित्रपटात प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता यावर्षी या चित्रपटाचा सिक्वेल दोस्ताना 2 रिलीज होणार आहे. यात जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवाणी मुख्य भूमिकेत आहेत. धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट हॉलिवूडचे दिग्दर्शक कोलिन डिचुन्हा दिग्दर्शित करत आहे.

बातम्या आणखी आहेत...