आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपनिंग डेला 'बच्चन पांडे' हिट:अक्षयच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 13 कोटींची कमाई, आलियाच्या 'गंगुबाई' आणि रणवीरच्या '83'ला पछाडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर एक नजर टाकुया-

कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा तोटा सहन करावा लागला. कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर आता इंडस्ट्रीची गाडी हळूहळू पुर्वपदावर येत आहे. दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार मोठ्या पडद्यावर राज्य करताना दिसतोय. त्याला 'बच्चन पांडे' हा चित्रपट शुक्रवारी (18 मार्च) रिलीज झाला असून पहिल्या दिवशी त्याचे कलेक्शन समाधानकारक राहिले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' या चित्रपटानेही पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर हा प्रदर्शित झालेला पहिला मोठा चित्रपट होता. ओपनिंग डे कलेक्शनच्या बाबतीत अभिनेता अक्षय कुमारचा रणवीर सिंग आणि आलिया भट्टपेक्षा चांगला रेकॉर्ड आहे. अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर एक नजर टाकुया-

  • अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी'

दिवाळीला प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 26.29 कोटींची कमाई केली. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. तर अजय देवगण आणि रणवीर सिंग यांनी कॅमिओ भूमिका साकारली होती. हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

  • अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'

'द कश्मीर फाइल्स'सोबत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर झाली आहे. कमी स्क्रीनवर रिलीज होऊनही अक्षयच्या बच्चन पांडेने पहिल्या दिवशी 13.25 कोटींची कमाई केली आहे. ज्याला एक चांगले ओपनिंग म्हटले जाऊ शकते. 'सूर्यवंशी' चित्रपटानंतर अक्षय कुमारला दुसरे चांगले ओपनिंग मिळाले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

  • रणवीर सिंगचा '83'

2021 च्या ख्रिसमसला रिलीज झालेल्या रणवीर सिंगच्या '83' चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन 12.64 रुपये होते. चित्रपटाच्या प्रमोशनचा विचार करता कमाईचा हा आकडा थोडा कमी होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. चित्रपटाला त्याचा निर्मिती खर्चदेखील वसूल करता आला नाही. 270 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 197.73 कोटींची कमाई केली. 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारित चित्रपटात दीपिका पदुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

  • आलिया भट्टचा 'गंगुबाई काठियावाडी'

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आलिया भट्टच्या 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.50 कोटींची ओपनिंग मिळवली होती. फीमेल स्टार लीड असलेला हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याची ओपनिंग इतकी उत्तम आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करत आहे.

बातम्या आणखी आहेत...